
मनमानी करणाऱ्या शाळा विरोधात युवाशक्ती फाउंडेशन व आम्ही नायगावकर संस्थेची तक्रार

प्रशासनाने असा कुठलाही ” जी आर ” दिलेला नाही की कोरोना काळात शालेय फी नाही भरली तर विद्यार्थ्यांना परिक्षेस बसु देवु नये . आणी प्रार्थमिक शिक्षण मिळणे हा सर्वांचा हक्क आहे .
लोकडाउन काळात नोकरीधंदा गमावून बसलेल्या अनेक पालक वर्गासमोर रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाले असताना प्रवेश शुल्क भरण्यासाठी वसईतील काही शाळा मनमानी करत आहेत याविरोधात बहुजन विकास आघाडी चे माजी महापौर रुपेश जाधव यांनी गटशिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे तर लॉक डाऊन काळात प्रवेश शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पशु दिले जात असल्याने युवाशक्ती फाऊंडेशन व आम्ही नायगावकर संस्थेने देखील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे शिक्षण आमच्या हक्काचे त्यामुळे गरजवंत विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे अशी भूमिका आम्ही नायगावकर व युवाशक्ती फाऊंडेशन संस्थेने घेतली असल्याची माहिती स्नेहा जावळे आणि चेतन घरत यांनी दिली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वसई पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले नायगाव पूर्व मधील बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेचे प्रवेश अर्ज न भरल्याने त्यांना परीक्षेला बसू दिले जात नसल्याचे उघडकीस आले आहे यासंदर्भात आमच्या नायगावच्या संस्थेच्या युवाशक्ती फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेत गरजू विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जावे तसेच त्यांना ऑनलाइन शिक्षण देखील दिले जावे यासाठी निवेदन देण्यात आले आम्ही नायगावकर सामाजिक संस्था व युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष कर्मवीर स्नेहा जावळे यांच्यावतीने गुरुवारी गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले योग्य ती चौकशी करून तुम्ही शाळांना पत्र काढा विद्यार्थ्यांना परीक्षा घ्यायला लावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही त्यांनी आमच्या या संस्थेशी संपर्क साधावा असे आव्हान आम्ही नायगावकर संस्थेचे अध्यक्ष चेतन घरत यांनी केले आहे खाजगी शाळांच्या वाढलेल्या मनमानी पणावर पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे शिक्षणाचा बाजार मांडलेल्या शाळा कडून आणखीन काय अपेक्षा करणार अशा उद्विग्न प्रतिक्रिया देखील व्यक्त होऊ लागल्या आहेत. शाळा सम्राटांनी संवेदनशील दृष्टिकोन दाखवून गोरगरीब पालका प्रति विद्यार्थ्या प्रति सहानुभूती दाखवणे संयुक्तिक असतांना हे शाळांचे अधिकारी मासिक प्रवेशशुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावत आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही ; या प्रकारामुळे शाळांच्या मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे . शाळेचा मनमानी कारभाराविरोधात वसईतील पालक एकवटल्यास आश्चर्य वाटायला नको.
