
चिपळूण/ ( सुर्यकांत देशपांडे )आपल्या समाजाची परंपरा आणि इतिहास,समाजातील भावी पिढीला समजावून देणे,ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.तो, इतिहास पाहता समाजातील तरुणांनी प्रशासन आणि राजकारणाला वळण लावण्यासाठी आग्रही भुमिका घ्यावी. असे प्रेरणादायी विचार, अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी व्यक्त केले.ज्ञातिबांधवांच्या, जिल्हा स्तरीय स्नेह मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
चिपळूण येथील, ताम्हाणे बँक्व्हेट हॉल मध्ये आयोजित या मेळाव्यास जिल्ह्यातील सीकेपी अर्थात, चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजबांधव, भगीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सोहळ्यास, पुण्याचे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील देशपांडे, खेडचे श्री सुनील चिटणीस, श्री समीरजी ताम्हाणे, एज्युकेशन सोसायटीचे श्री अजित कोंढवीकर श्री संजय वैद्य, चिपळूण कार्यकारिणीचे पदाधिकारी आदि मान्यवर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक बांधव उपस्थित होते.
रविवार दि तेरा नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे स्वरुप पाहूण्यांचे स्वागत, उद्घाटन सोहळा,विचार मंथन,दुपारी भोजन,आणि सांस्कृतिक कार्यक्रम व समारोप अशा प्रकारे संपन्न झालेल्या या सोहळ्यात प्रारंभी विशेष करुन मृत्युपश्चात देहदान केलेल्या श्री प्रकाश काररवानिस सौ ज्योती काररवानिस यांचा सत्कार समस्त रत्नागिरीकर ज्ञाती बांधवांच्या वतीने करणेत आला.
या नंतर श्री सुनील देशपांडे यांनी पुढील वाटचालीसाठी प्रेरक मार्गदर्शन केले. समाजाच्या उज्वल ऐतिहासिक परंपरेचे स्मरण केले
आपल्या मुख्य भाषणात अध्यक्ष समीर गुप्ते यांनी,वरील संदर्भ देत समाजातील तरुणांना, योग्य मार्गदर्शन करण्यास,अनेक मान्यवर उत्सुक असून,आपण स्वतः प्रयत्नशील राहणार आहोत,अशी ग्वाही, यावेळी त्यांनी दिली.सीकेपी समाजाच्या राष्ट्रीय स्तरावर असलेल्या गौरवशाली इतिहासाचे स्वरुप अधोरेखित करत,आजची वस्तुस्थिती विशद केली, आपला समाज प्रगत आणि इतरांना हेवा वाटणारा आहे. समाजातील महिला या दक्ष आणि सुगरणी आहेत.,आपली खाद्यसंस्कृती,वेचक,वेधक आहे. मात्र वैवाहिक विचारसरणी कशी कोशात अडखळते,याचे भानही करुन दिले. अशा,आपल्या सामाजिकतेचा ओझरता लेखाजोखा घेऊन,समाजबांधवांच्या ऐतिहासिक,सामाजिक कार्यकर्तृत्वाचे दाखले दिले,ते व्यापकतेने सर्वासमोर आणण्याचा संकल्प असुन,त्या साठी अनेक ज्ञातीबांधवाचे सहकार्य लाभत असल्याचेही, त्यांनी सांगितले.
या संमेलनाचे सुत्रसंचालन श्री रोहीत कुळकर्णी यांनी अतिशय नेटके केले. ज्ञातीबांधवांच्या कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रमानंतर स्नेहसंमेलनाची सांगता उत्तम रित्या झाली,ते अतिशय उत्तम प्रकारे संपन्न व्हावे,यासाठी चिपळूण कार्यकारिणीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.