वैतरणा व शिरगाव खाडीत अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या तीन बोटी, एक सक्शन पंप जप्त
पाच बोटी आणि सात सक्शन पंप स्फोटकाद्वारे नष्ट
विरार (प्रतिनिधी ) पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वसई उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, वसई तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी आज वैतरणा व शिरगाव खाडीत अवैद्यपणे सक्शन पंप द्वारे रेती उपसा करून शासनाचं तथा पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींना जोरदार दणका दिला. येथील अनधिकृत पणे रेती उत्खन करणाऱ्या तीन बोटी, एक सक्शन पंप जप्त केला .तर पाच बोटी आणि सात सक्शन पंप स्फोटकाद्वारे उडवून त्यांना नष्ट करण्यात आल्या त्यामुळे बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन करणाऱ्या व्यक्तींचे कंबरड मोडल आहे. वसई प्रांताधिकारी शेखर घाडगे व तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी पदभार स्वीकारताच सगळ्या त मोठी कारवाई केल्याने अवैधपणे रेती उपसा करणे व शासनाच महसूल बुडवणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. या कारवाईत त्यांच्याबरोबर नायब तहसीलदार दीपक गायकवाड, चंद्रकांत पवार, शशिकांत नाचन ,तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सहभाग घेतला होता. चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाकरता वैतरणा व आजूबाजूच्या खाडीतील रेती उपसा करण्यासाठी बंदी घातली आहे. त्याचबरोबर शासनाने देखील सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपयात घरपोच रेती देण्यास सुरुवात केलेली आहे यासाठी शासनामार्फत डेपो तयार करण्यात येणार असून व ऑनलाइन बुकिंग द्वारे सर्वसामान्यांना घरे बांधण्यासाठी रेतीचा पुरवठा स्वस्तात करण्यात येणार आहे . ही सर्व प्रक्रिया महसूल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे परंतु वैतरणा शिरगाव व आजूबाजूच्या खाडीमध्ये काही व्यक्ती बेकायदेशीरपणे सक्शन पंपाद्वारे उपसा करून त्याची बोटि द्वारे वाहतूक करत होते. याबाबत प्रांताधिकारी वसई व तहसीलदार वसई यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज संपूर्ण पोलीस बंदोबस्तात वैतरणा व शिरगाव येथे जाऊन अनधिकृतपणे रेतीचे उत्खनन करणारे सक्शन पंप व बोटी यांना स्फोटाद्वारे उडून दिल्या तर काही बोटी व सक्शन पंप जप्त करण्यात आले. यापुढे देखील अशाच पद्धतीने कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रांताधिकारी शेखर घाडगे यांनी दिला आहे.