
बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून बॅसीन कॅथॉलिक को-ऑप बँकेची एक वेगळी ओळख आहे, आणि विविध पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ह्या बँकेला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
आधुनिक युगात ग्राहकांना विविध योजनेची माहिती करून देण्यासाठी जाहिरात हे एक प्रभावी माध्यम आहे. बॅसीन कॅथॉलिक को-ऑप बँकेने गेल्या वेळी बनवलेल्या जाहिरातीमध्ये सिनेअभिनेते मकरंद देशपांडे ह्यांना घेतले होते आणि त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळाला होता, परंतु ह्यावेळी मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी ह्यांना घेउन जाहिराती प्रदर्शनाच्या वाट्यावर आहेत, सदर जाहिरातीचे दिग्दर्शन दुर्वा क्रीएशन्सचे अमित प्रभुणे ह्यांनी केले असून, डिओपी स्वप्नील मनवळ आणि क्रीएटीव्ह हेड म्हणून अमित पटेल ह्यांनी काम पाहिले आहे.