वसई (प्रतिनिधी) : प्रेसिडंट लायन्स क्लब अगाशी तर्फे रोजीसेंट जेम्स स्कुल (मराठी माध्यम) आगाशी मधील ६५० विद्यार्थांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सदर गणवेशाचे वाटप अध्यक्ष जॉन कोरिया, माजी अध्यक्ष नितीन पुरकर , राहुल रुमाओ, आगाशी गावातील समाजसेवक प्रभाकर वागळे , रत्नाकर वागळे , आकाश राव , रेश्मा गायकवाड, दिप्ती भोईर, रानगांव गावातील कार्यकर्ते विकी भाले, कुणाल पवार, नदीम मण्यार , राजेश निजाई , प्रमोद, दिपक, तसेच आगाशी गावीतील लायन्स क्लबचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रेसिडंट लायन्स क्लबचा हा स्त्युत्य उपक्रम असून , त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून विद्यार्थांना मदतीचा हात दिला आहे. लायन्स क्लबच्या
स्त्युत्य उपक्रमामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेताना आधार लाभला आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *