
जागोजागी गटारे तुंबती
रस्ते सारे जलमय होती
पर्यावरणाचा होई नाश
तरीही मानवास प्लॕस्टिकची आस
पक्षीप्राण्यांचा आवळी फास
जलचरांचा नाहीसा घास
पर्यावरणाचा अपरिमित -हास
तरीही शासनास प्लॕस्टिकचा ध्यास
बंदीचा चाललाय नूसता फार्स
निसर्गप्रेमीचा आहे अट्टाहास
प्लॕस्टिकबंदीचा निश्चय खास
सर्वांची साथ हाच विश्वास
सौ. कॕथरीन फेलिक्स परेरा
सहशिक्षक
जि .प. तुळींज मराठी
अध्यक्ष वसई तालुका प्राथमिक शिक्षक संघ