मायनगरी, स्वप्ननगरी मुंबईत अनेक जण उराशी नवनवीन स्वप्ने बाळगत येत असतात. या धावपळीच्या शहरात स्वत: चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. त्यात मुंबई ही स्वप्नांच्यानगरी प्रमाणे कलाकरांची प्रसिद्ध बॉलीवूड नगरी देखील आहे. देशातील कानाकोपर्‍यातील अनेक नवोदीत कलाकार तरुण तरुणी या बॉलीवूडमध्ये एंन्ट्री मिळवण्यासाठी आणि आपली कला, अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहण्यासाठी मेहनत घेत असतात. याचप्रमाणे बॉलीवूडमध्ये आपली जादू निर्माण करण्यासाठी व आपले अभिनेत्री होण्याचे स्वप्न यशस्वीरित्या पूर्ण करणारी मुंबईची मराठी मुलगी म्हणजे फिल्मी दुनियेतला नवा चेहरा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे.

2019 मध्ये प्रदर्शित झालेले मराठीत ‘ई-मेल-फीमेल’, ‘तुझ्यात मी’ या मराठी चित्रपटांमध्ये प्राजक्ताने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याचप्रमाणे ‘हाथों मे हाथ’ आणि ‘प्यार होता जा रहा है’ या दोन संगीत अल्बममध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची आणि मोहक अदांची जादू दाखवून दिली आहे.
 श्रीदेवी आणि माधुरीला आदर्श मानणारी प्राजक्ताला भविष्यात सर्वाधिक आव्हानात्मक भूमिका साकारायची आहे. अभिनेत्री आलिया भट्टची अभिनय शैली  प्राजक्ताला नेहमी प्रभावित करत असते. मराठी मुलगी प्राजक्ताला आपल्या मराठी भाषेबद्दल जिव्हाळा, प्रेम आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळणार्‍याचे प्राजक्ताची स्वप्ने खूप मोठी आहेत.
मुंबईत जन्म झालेली प्राजक्ताने अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत बॉलीवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आहे. तिला या बॉलीवूड इंडस्ट्रीत यशाचे, प्रसिद्धीचे शिखर गाठायचे आहे.
या संदर्भात प्राजक्ता सांगते की, मला लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघत होते.  तासांतास आरश्यासमोर उभे राहून अभिनय करायचे.  प्राजक्तला नृत्याची देखील आवड असून ती साल्सा या नृत्य प्रकारात पारांगत आहे.
पुढे प्राजक्ता सांगते,  कोणतेही काम करताना स्वत: मध्ये  आत्मविश्‍वास असणे अत्यंत गरजेचे असते. जर आपण कोणत्याही कामात आपली 100 टक्के मेहनत, आवड, चिकाटी दाखवली तर त्यात आपल्याला 100 टक्के यश हे मिळतेच. काही याचप्रकारे प्राजक्ता देखील आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करत स्व:ता 100 टक्के मेहनत घेते.
प्राजक्ताला अभिनयासोबतच विकेंडला फिरायला जाणे, समुद्रकिनारी फिरणे, मित्रमैत्रिणींसोबत लाँगड्राईव्हला जाणे, सायकलिंग करणे, नवी मित्र मैत्रिणी बनवणे, फॉमिलीसोबत टाईम स्पेंड करणे, शॉपिंग करणे, चित्रपट पहाणे, पार्टी करणे, गाणे ऐकणे खूप आवडते. प्राजक्ता अभिनेता रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांची मोठी चाहती आहे. तिला एक्शन चित्रपट पाहण्यास आवडतात.
प्राजक्ताला भविष्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करायचे आहे. व आपल्या अभिनयाची, नृत्याची, नावाची छबी बॉलीवूडमध्ये आणखी मोठे करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *