
वसई, (मनीष म्हात्रे) : देशातील नावाजलेली बँक ऑफ इंडिया या बँकेला चालू वर्षात पहिल्याच तीन महिन्यात तब्बल ७२० कोटींचा भरघोस फायदा झाल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए के दास यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. याबाबतची माहिती व्यवस्थापकीय मंडळाच्या कार्यकारीणीच्या आढावा बैठकीत मंगळवारी देण्यात आली. बँकेच्या आर्थिक वर्षातील चार तिमाहीत केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला जात असताना सन २०२१-२२ च्या चालू आर्थीक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात बॅकेने चांगली कामगिरी केली असून ,गतवर्षीच्या कामगिरीतील उणीवा सुधारण्यावर बॅकेने भर दिला होता. जून २०२१ च्या संपलेल्या तिमाहीच्या आढाव्यात बॅकेने ७२० कोटी नफा मिळवला आहे. मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीपेक्षा १८८ टक्के इतका हा नफा झालेला आहे. तसेच ऑपरेटींग प्राॅफीट ३४ टक्के म्हणजेच जवळपास २ हजार ८०६ करोड इतका आहे.व्याजाव्यतीरीक्त उत्पन्नामध्येही ३९ टक्के वाढ झालेली आहे. रिटेल कर्जामध्ये १० पूर्णांक ५७ टक्के इतकी वाढ झाली आहे. कृषी कर्जामध्ये ११.८ टक्के वाढ झालेली आहे. सूक्ष्म, लघू आणी मध्यम व्यावसायीकांना देण्यात येणा-या कर्जामध्ये ११.४५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. चालू आणी बचत खात्यामध्ये १३.८० टक्क्यांची वाढ झाली आहे. कर्ज वाटप करताना त्याची वसूलीही चांगल्या पद्धतीने झालेली असून बॅकेचा एनपीए २३ बीपीएसने कमी आला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून बॅकेने अनेकांना आर्थीक हातभार दिला आहे. त्यातून अनेकांनी आपली प्रगती साधली आहे. त्याचाच फायदा बॅंकेला झालेला आहे .बॅक ऑफ इंडियाने सर्वच क्षेत्रात यंदाच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत उल्लेखनीय कामगिरी केल्याने सर्व अधीकारी, कर्मचारी आणी बॅकेचे खातेदार हितचींतक यांचा यामध्ये मोलाचा सहभाग असल्याचेही व्यवस्थापकीय संचालक ए के दास यांनी सांगीतले.
आगामी काळात बॅक ऑफ इंडिया आणखीन चांगले काम करून देशातील सर्वच स्तरातील नागरीकांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.