जयंती पिलाने वसई विरार महानगरपालिका मध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता होती ,सध्या प्रशासकीय राजवट असल्यामुळे लोकप्रतिनिधी अनेक प्रभागांत लक्ष देत नाहीत, बरफ पाडा येथील माजी नगरसेवकांच्या कार्यकाळात देखील बरफ पाडा येथील रस्ते गटार स्वच्छता या मूलभूत सुविधांकडे यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सध्या बरफ पड्याच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत व वारंवार विनंती करून देखील हा कचरा उचलला जात नाही, त्यामुळे आता नागरिक संतापले असून येत्या आठ दिवसात हा कचरा उचलला नाही तर आयुक्त डी गंगाथरण यांच्या दालनात सर्व कचरा फेकणार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे, त्याचबरोबर माजी नगरसेवक यांनी या प्रभागात प्रभावीपणे काम केले नाहीत व त्यामुळे येथील नागरिक संतापले असून भविष्यात यांना कोणीही मत देणार नाही असा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे, वसई विरार शहर महानगर पालिकेमध्ये मागील दहा वर्षांपासून बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे प्रभाग समिती सी चंदनसार प्रभाग क्रमांक एक मध्ये देखील बहुजन विकास आघाडी यांचा नगरसेवक आहे मात्र या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात बरफ पाडा येथील कोणत्याही नागरी समस्या सोडायला नाही त्यामुळे येथील गाव पाड्यात राहणारे आदिवासी बांधव यांच्यामध्ये या लोकप्रतिनिधीं बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, याबाबत अनेक विनंती अर्ज करून देखील वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग येथील कचरा उचलत नाही त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून कोरोणा काळात साथीचे रोग होण्याची तीव्र शक्यता वर्तवली जाते, या ठिकाणी धुराची फवारणी, गटारांमध्ये औषध फवारणी ,देखील होत नाही ,त्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे त्याचबरोबर कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा जेणेकरून नव्याने येणारा ठेकेदार नगरातील वाडी पाड्यातील स्वच्छते कडे योग्य ते लक्ष देऊन परिसरात व प्रभागात स्वच्छता राखील अशी नागरिकांची मागणी आहे ,वसई विरार महानगरपालिके मार्फत बरंफ पाड्यातील सर्व नागरिकांकडून नियमित कर वसुली केली जाते या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात चाळी देखील बांधले आहेत आहेत त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे, महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य प्रशासनामार्फत येथील नागरी सुविधांकडे कोणत्या ही प्रकारे लक्ष दिले जात नाही त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या परिसरात जाण्यासाठी रस्ता नाही विजेची सोय नाही त्यामुळे येथील आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत महानगरपालिकेचे आरोग्य विभाग या परिसरातील स्वच्छतेकडे ढुंकूनही बघत नाही त्यामुळे येथे दिवसेंदिवस कचरा अधिक साचत चालला आहे व त्यातून निघणारी दुर्गंधी यामुळे नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाले आहे ,तरी येत्या आठ दिवसात या ठिकाणचा कचरा हटला नाही तर सर्व जमलेला कचरा आयुक्तांच्या दालनात टाकणार असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे,