महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांतील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या आजाराचा विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून खालीलप्रमाणे सूचना देण्यात आहेत.

               

१) नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये कोंबड्या, कावळा, कबुतर किंवा इतर पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास त्याची माहिती त्वरित महानगरपालिका आपत्कालीन विभाग रॅपीड रिस्पॉन्स टीम हेल्पलाईन क्र. ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७ वर कळविण्यात यावी.
२) महानगरपालिकेकडे प्राप्त माहितीनुसार सदर मृत पक्ष्यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.
३) नागरिकांनी आजारी पक्षी यांच्याबरोबरचा संपर्क टाळावा.
४) संसर्गापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
५) मांस व अंडी व्यवस्थित शिजवून खावीत.
६) बर्ड फ्लू रोगाची लक्षणे :
• श्वासोच्छवासामध्ये अडथळे येणे.
• खोकल्याची समस्या
• कफ जमा होणे
• डोकेदुखी
• तापासह शरीर आखडणे
• शारीरिक वेदना इ.
७) वरील लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि योग्य ते औषधोपचार घ्यावेत.
८) वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात बर्ड फ्लू सदृश्य आजाराचा रुग्ण आढळल्यास रुग्ण भरती करण्याकरिता महानगरपालिकेने विलगीकरण कक्ष स्थापन केलेला आहे.
९) मृत पक्षांची विल्हेवाट लावण्यापूर्वी महानगरपालिका आपत्कालीन विभागाच्या रॅपीड रिस्पॉन्स टीम हेल्पलाईन क्र. ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७ येथे निदर्शनास सदर बाब आणून द्यावी व पशुसंवर्धन विभागांच्या सूचनेनुसार मृत पक्षांची विल्हेवाट प्रभागनिहाय महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन, विभाग प्रमुख यांचे नियंत्रणाखाली लावणेत येईल.
१०) Avian Influenza Action Plan to Control & Prevent – Revised Guidelines 2021 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार मृत पक्ष्यांना खड्ड्यामध्ये पुरण्यासाठी चुनखडीचा वापर करणे आवश्यक असेल. सदर खड्डा भटक्या प्राण्यांमार्फत उकरला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असेल.
११) प्रभाग समिती, सहाय्यक आयुक्त हे त्यांच्या अधिपत्याखालील मांस/मटण दुकानांचे सर्वेक्षण, सनियंत्रण करून सदर दुकानांचा स्वच्छता आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करतील.
१२) बर्ड फ्लू रोगाबाबत मटण विक्रेते/ कुक्कुट पालक /नागरिक यांना बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणेकरीता आरोग्य विभाग – आय.ई.सी.(Information Education & Communication) जनजागृती करतील.
तरी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन महानगरपालिकेस सहकार्य
करावे असे आवाहन वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

                                                                            

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *