

बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती श्री. प्रशांत दत्तात्रय राऊत यांच्यावरती, बोगस व बनावट बांधकाम परवानगी तयार करून, त्या परवानगीच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करून शासनाची व सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी विरार पोलिस स्टेशन येथे भा.द.वि.स. कलम 420, 467, 468, 471 व 34 आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 52 53 54 अन्वये गंभीर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या गुन्हे कृत्याबाबत शिवसेनेचा तडफदार युवा नेता श्रेयस श्रीकांत म्हात्रे याने माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय नगर विकास मंत्री, पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय, पालिका आयुक्त डि गंगाधरन यांना तक्रार अर्ज दिला होता.
बविआचा वजनदार नेता या गुन्ह्यात सामील असल्याने तसेच महानगरपालिका निवडणुका देखील तोंडावर आल्या असल्याने बहुजन विकास आघाडीला जोरदार धक्का देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर म्हात्रे यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाऊन तात्काळ गुन्हा दाखल झाला असल्याचे खाजगीत बोलले जात आहे.




