मृत सफाई कामगार हजर दाखवून, अधिकारी आणि कंत्राटदार मिळून केला; करोडो रुपयांचा भ्रष्टाचार- प्रा. डी. एन. खरे

विरार दि. १७/०१/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती-ई मधील झोन क्र. ९ च्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम मे. अनंत एंटरप्रायजेस यांना देण्यात आले. सदरच्या ठेक्याची RTI द्वारे सन-२०२२-२०२३ या वर्षात प्रभाग समिती- E मध्ये ठेका तत्वावर रुजू असलेल्या सफाई कामगारांची यादी मागितली असता सदर माहिती नुसार मे. अनंत एंटरप्रायजेस चे मालक- श्री. रवी चव्हाण तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. सुखदेव दरवेशी, उप आयुक्त- डॉ. चारुशीला पंडित व आयुक्त श्री. अनिलकुमार पवार यांनी भ्रष्टाचारा द्वारे वसई-विरार च्या जनतेचा पैसे मोठ्या प्रमाणात गिळंकृत केला असल्याचा आरोप प्रा. डी. एन. खरे यांनी केला.

सदर प्रकरणाच्या संदर्भाने, रविंद्र राम सलवादे हे व्यक्ती मयत असून सुद्धा त्यांच्या नावाचा समावेश सन-२०२२-२०२३ मध्ये ठेका तत्वावर रुजू असलेल्या सफाई कामगारांच्या यादीत आहे. अर्थात सदरच्या कामगाराचा मासिक पगार कामगार गैरहजर असतांना सुद्धा ठेकेदाराच्या खात्यात जमा होतो. व त्या ऐवजी कोणताही कामगार काम करत नाही.

तसेच अवध पट्ठेलाल मिश्रा, बेचेन संचम गुप्ता, गाडफ्रे डॉमनिक डेविस, वनिता विनोद तांबे यांना कामावरून कमी केले असतांना सुद्धा त्यांच्या नावाचा समावेश सन-२०२२-२०२३ मध्ये ठेका तत्वावर रुजू असलेल्या सफाई कामगारांच्या यादीत आहे. अर्थात सदरच्या कामगाराचा मासिक पगार कामगार गैरहजर असतांना सुद्धा ठेकेदाराच्या खात्यात जमा होतो. व त्या ऐवजी कोणताही कामगार काम करत नाही.
तसेच महत्वाची बाब अशी की, ठेका तत्वावर मंजूर कामगार परिमाण १४० पैकी फक्त १०८ कामगारच प्रत्येक्ष काम करत आहेत. उर्वरित ३२ कामगारांचा पगार ठेकेदार मे. अनंत एंटरप्रायजेस यांच्या बँक खात्यात जमा होतो. परंतु त्या ऐवजी कोणताही कामगार काम करत नाही. त्यामुळे कामगार अपुरे पडून विनाकारण नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
सदरचा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी तात्काळ बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी सुद्धा प्रा. डी. एन. खरे यांनी आयुक्ताकडे केली. तसेच दि. ३१/०१/२०२४ रोजी पर्यंत मे. अनंत एंटरप्रायजेस त्यांचे लायसन्स तात्काळ काळ्या यादीत समाविष्ट करा अन्यथा दि. ३१/०१/२०२४ रोजी आयुक्त कार्यालया समोर धरणा आंदोलन करणार असल्याचा इशारा बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी प्रा. डी. एन. खरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *