
वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून वसईत बेकायदा अनधिक्रूत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम येथे प्रगतीपथावर असताना अवैध शाळा शाळा चालकही वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुकान मांडून बसलेले आहे. संपुर्ण पालघर जिल्ह्यात एकूण 190 अवैध शाळा असून त्यात विद्यार्थ्यांकडून दामदुपटीने पैसे वसूल केले जात आहेत. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणार्या वसई तालुक्यातील 150 अनधिकृत शाळा चालकांवर गुन्हा दाखल करण्याबाबतची तक्रार बहुजन महा पार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी मा.प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग व उप सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या कार्यलयात दि.26/07/2018 रोजी केली होती .सदर तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने आतपर्यंत एकूण 18 अनधिक्रूत शाळा चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. अवैध शाळांचे सर्वाधिक प्रमाण हे वसई-विरार परिसरात आहे. त्यादृष्टीने वसई, विरार, नालासोपारा परिसरातील फक्त 18 शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कायम विनाअनुदानित या तत्वावर शिक्षणाचा बाजार तथाकथित शिक्षणसम्राटांनी सुरू केला आहे. ज्या अवैध शाळा आहेत त्या शिक्षणाऐवजी केवल व्यवसायीक दृष्टीकोन समोर ठेवून सुरू करण्यात आल्या आहेत की काय ? असा प्रश्न पडतो. खालावलेली शिक्षणपद्धती याला अवैध शाळा जबाबदार आहेत.याबाबत शमशुद्दीन खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की वसई तालुक्यात एकूण 150 अनधिक्रूत शाळा आहे याबाबतची यादी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी जाहीर केलेली आहे.त्याअनुषंगाने सर्व अनधिक्रूत शाळा चालकांवर गुन्हा दाखल करण्याबाबतची आम्ही तक्रार दाखल केलेली आहे.शिक्षण विभागामार्फत आतापर्यंत फक्त 18 अनधिक्रूत शाळा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्वरित 132 शाळा चालकांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. शिक्षण विभागामार्फत लवकरात लवकर सर्व अनधिक्रूत शाळा चालकांवर गुन्हा दाखल करून अनधिक्रूत शाळा बंद करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. सर्व अनधिक्रूत शाळा चालकांवर शिक्षण विभागाने लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करून शाळा बंद करावे अन्यथा अनधिक्रूत शाळा चालकांना संरक्षण पुरविणाऱ्या दोषी अधिकारी यांच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहोत असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शमशुद्दीन खान यांनी सांगितले आहे.

