
कॉंग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलेले व त्या पक्षाचे विरारचे अध्यक्ष मोहसीन शेख यांना कॉग्रेस पक्षात न्याय मिळत नसल्याने तसेच कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रत्येक विधानसभा निवडणूकीत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देवून उमेदवार उभा करत नसल्याने या परिसरात कॉंग्रेस पक्ष वाढत नाही ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे त्या पक्षात कितीही काम केले तरी आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे माझ्या लक्षात आल्याने व माझ्या सोबत असलेल्या सर्व कार्यकर्ते यांनी मला बहुजन महा पार्टीत प्रवेश घेवून पक्ष वाढीचे काम करण्याची आमच्या सर्वांची इच्छा असल्याने आम्ही सर्वजण बहुजन महा पार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांच्या उपस्थित बहुजन महा पार्टीत प्रवेश घेतला आहे व पक्षाने मला नालासोपारा विधान सभा मतदार संघात उमेदवारी दिली आहे त्यामुळे मी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे मोहसीन शेख म्हणाले. नालासोपारा विधानसभा निवडणूकीत बहुजन महा पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मला निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत मला येथील नागरिकांचे आशीर्वाद व त्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने या निवडणूकीत मला प्रचंड मतांनी विजय प्राप्त होईल असे मला वाटत आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मोहसीन शेख यांनी सांगितले आहे.