कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात लॉकडाउनमुळे नागरिक गेले 3 महिने घरी असून काम नाही,हाती पैसा नाही अशा परिस्थितीत आपले युवा आमदार मा. श्री.क्षितीज ठाकूर सर्व नागरीकांची मागील 3 महिन्याची वीज बिले माफ करावी असे पत्र महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री मा.उपमुख्यमंत्री,मा.ऊर्जा मंत्री यांना सादर करणार आहे. विजमंडळाकडून रीडिंग न घेता अवास्तव वाढीव आकारणी करून पाठवलेली वीज बिले,ऑनलाइन बिले भरूनही आलेली अवाजवी बिले याबाबत लोकनेते आमदार श्री.हितेंद्र ठाकूर,युवा आमदार श्री.क्षितीज ठाकूर, संघटक सचिव,नगरसेवक श्री. अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज बहुजन विकास आघाडी विरार पूर्व विभाग यांच्यावतीने कार्यकारी अभियंता विरार पूर्व यांना त्यांचे कार्यालयात निवेदन देण्यात आले,यावेळी उपस्थित नगरसेवकांनी चर्चा करताना ही वाढीव चुकीची बिले नागरीकांनी कशी भरावी,याबाबत जाब विचारून सदर वाढीव वीज युनिट बिले,रीतसर युनिट आकारून तसेच इंधन अधिभार व दंड व्याज न आकारता बिले द्यावी व भरण्यासाठी वाढीव मुदत द्यावी,अशी मागणी केली आहे,अन्यथा कोणीही नागरीक बिले भरणार नाही, तसेच लवकरच वसई येथील वरिष्ठ अधिकारी यांना भेटणार आहे,असे सुनावले.
यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती श्री.प्रशांत राऊत,ज्येष्ठ नगरसेवक श्री.महेश पाटील,प्रभाग ब सभापती श्री.यज्ञेश्वर पाटील, महिला बाल कल्याण सभापती सौ.माया चौधरी, नगरसेवक श्री.विनय पाटील, नगरसेविका सौ.मिनल पाटील,सौ.चिरायू चौधरी,सौ. संगिता भेरे,सौ.हेमांगी पाटील, सौ.प्रतिभा पाटील,सौ.ममता सुमन व कार्यकर्ते श्री.प्रशांत लाड,स्वप्नील पाटील,विनोद पाटील,प्रणव चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *