
अखिल भारतीय जीवा सेनेच्या 25 व्या वर्धापण दिनानिमित्त नांदेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय जीवा सेनेचे अध्यक्ष मा.गोविंद पिंपळगावकर , सत्कारमूर्ती श्रीमती चंद्रप्रभावती केशवरवजी धोंडगे, उद्घाटक म्हणून प्राचार्य, डॉ. अशोक गवते,प्रमुख मार्गदर्शक मा. एस जी माचनवार , प्रा.डॉ.गौतम दुथडे, इंजी.चंद्रप्रकाश देगलूरकर,प्रा.राजकुमार गाजरे, प्रा.डॉ.दत्ता कुंचेलवाड, प्रा.गंगाधर मनसकरगेकर, मा.लक्षमण कोंडावार, इंजि.एल. आर. लिंगापूरे, साहेबराव शेळके, नवनाथ घोडके यांची उपस्थिती होती.
प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतान डॉ.दत्ता कुंचेलवाड म्हणाले की, अखिल भारतीय जीवा सेना हि बुद्ध, शाहु, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, सावित्रीबाईफुले यांच्या प्रेरणेतून पुढे आली.समाजातले आज्ञान, दारिद्र्य व अंधश्रद्धा दुर करण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. समाजाच्या उत्थानासाठी काम केलेल्या महनीय व्यक्तीमत्वांचा सन्मान करण्याचा आमचा उद्देश होता आणि तो सफल होतो आहे असे प्रा.कुंचेलवाड म्हणाले. उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले. वीर जिवाजी महाले यांच्या जीवन चरित्रावर पुस्तक लिहून आपल्या बहाद्दरपुरा स्थित घरासमोर वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारल्याबद्दल भाई केशवराव धोंडगे साहेब यांना अखिल भारतीय जीवा सेनेच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती चंद्रप्रभावती बाई केशवरावजी धोंडगे या उपस्थित होत्या. यावेळी मानपत्राचे वाचन मा.लक्ष्मण कोंडावार सर यांनी करून त्यांचा कर्तुत्व आणि कार्याचा गौरव केला. यानंतर मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पहार देऊन माईंना सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना प्रभावतीबाई धोंडगे म्हणाल्या की, माझ्या पतीचे केशवराव धोंडगे साहेबांचे काम हे उपेक्षित वंचित व दुर्लक्षित समूहासाठी आयुष्यभर काम केलें आहे. या सेवेच्या बदल्यात आम्हाला परिसरातील व जिल्ह्यातील लोकांनी भरभरून आशीर्वाद व प्रेम दिले. आज आपण त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वीर जिवाजी महाले यांच्या नावाने जो पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित करत आहात हे आमच्या कुटुंबियांसाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. आम्हाला बहुजन समाजाने दिलेले प्रेम आम्ही आयुष्यभर विसरणार नाही असे माई म्हणाल्या. तसेच दुसरी सत्कारमूर्ती प्रसिद्ध साहित्यिक तथा गोंडर कादंबरीकार प्राध्यापक अशोक कुबडे यांनाही मानपत्र , सन्मान चिन्ह, शाल व पुष्पहार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले . माणपत्राचे वाचन इंजी.लिंगापुरे यांनी केलें. सत्काराला उत्तर देताना अशोक कुबडे म्हणाले की, माझ्या गोंडर कादंबरी ला महाराष्ट्रातून जवळपास 40 पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु माझ्या समाजाकडून मिळणारा हा सन्मान माझ्यासाठी बहुमोलाचा आणि दिशादर्शक असणार आहे. आपल्या कौतुकाच्या वर्षवामुळे मी आणखीन समाजसेवा करण्यासाठी अधिक उत्साह होईल असे म्हणून आयोजकाचे ऋण व्यक्त केले. तसेच छ. संभाजी नगर, परभणी , हिंगोली,जालना येथुन संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. साहेबराव शेळके,सुरेश बोर्डे, नवनाथ घोडके, ॲड. अशोक राऊत, आण्णासाहेब बर्वे ,गणेश वैद्य,मुंजाभाऊ भाले,विजय सोनवणे, रामेश्वर सवने, राम कंठाळे, लक्ष्मीकांत रांजनकर, राम सुर्यवंशी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या शिलेदारांनी छत्रपती संभाजीनगर येथे वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यासाठी बारा वर्षे संघर्ष करुन वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारले. म्हणून वरील छ.संभाजीनगरहुन कार्यक्रमासाठी आलेल्या बारा शिलेदारांंचा संघटनेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. काही पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत मांडले ज्यात साहेबराव शेळके, नवनाथ घोडके, सुरेश बोर्डे, विजय सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. एस.जी.माचनवार यांनी ओबीसी व बहुजन समाजातील युवकांनी आपल्या समाजाचे दारिद्र्य दूर करण्यासाठी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून गतीने काम केले पाहिजे असे म्हणाले. तसेच दुसरे मार्गदर्शक प्रा. डॉ. गौतम दुथडे म्हणाले की, अखिल भारतीय जीवा सेना हे संघटन उपेक्षित वंचित समाजासाठी काम करत आहे. संघटनेची ध्येय आणि उद्दिष्टे समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणारे आहेत. म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेच्या कार्याचे सिंहावलोकन करून समाजातल्या समस्यांचा वेध घ्यावा व आपल्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असले पाहिजे असे म्हणाले. इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी अखिल भारतीय जीवा सेनेच्या कार्य व वाटचालीचा आढावा घेऊन जिवा सेनेने समाजाचे प्रश्न पोट तिडकेने मांडण्यासाठी संघटितपणे काम करणे गरजेचे आहे असे म्हणाले. अखिल भारतीय जिवा सेनेचे कार्याध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक प्रा राजकुमार गाजरे यांनी संघटनेच्या निर्मितीच्या वाटचालीपासून ते आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे.तसेच भविष्यात संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करण्याचा संकल्प बोलुन दाखवला.अखिल भारतीय जीवा सेना ही न्याय हक्काच्या मागणीसाठी, विज्ञान, परिवर्तन आणि भारतीय संविधान या तत्त्वाचा अवलंब करून वाटचाल करणारी आहे. फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने वाटचाल करणारी संघटना आहे. तसेच ही संघटना समाजातले शिक्षणाचे प्रमाण वाढण्यासाठी भविष्यात वस्तीगृहाची निर्मिती करण्यासाठी तसेच राजकीय क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी विविध निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.तसेच आमच्या महापुरुषांचे चरित्रात्मक साहित्य पुढे येण्यासाठी लेखकांनी, साहित्यिकांनी आणि संघटनेतील सुजान कार्यकर्त्यांनी निरपेक्षपणे लेखनाचं काम करावं असेही म्हणाले.कार्यक्रमाचे संचलन मा. लक्षमण पंदीला तर आभार मा.सतीश चंद्र शिंदे यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, युवा जिल्हाध्यक्ष श्याम जाधव, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख गंगाधर जाकारे, , विभागीय उपाध्यक्ष श्री बालाजी हाळदेवाड,दक्षिण महानगर अध्यक्ष गजानन शास्त्री, उत्तर युवा अध्यक्ष राजेश महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष अनिल संजीवनकर, जिल्हा सचिव अशोक खोडके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नामदेवराव शिंदे,बाळासाहेब राहाटीकर, उत्तम गाजलवार, पुंडलिक सावळेश्वरकर, मंगेश खोडके,
गजानन महाजन, विठ्ठल महाजन, विश्वनाथ महाजन,
….. आदींनी परिश्रम घेतले.