विरार दि. १८/१०/२०२२ बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेवर मोर्चा काढून पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले.

गेली अनेक वर्षापासून कातकरीपाडा विरार पूर्व येथे पाण्याची समस्या गंभीर असुन सुद्धा महापालिका प्रशासन या विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टी द्वारे करण्यात आला.
महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र लाड साहेब प्रभाग समिती सी चे अभियंता प्रदिप पाचंगे साहेब यांनी सर्व मागण्या मान्य करून त्या संदर्भाने कातकरी पाड्यांमध्ये ४ नवीन पाईपलाईनचे प्रस्ताव तयार करणार असल्याचे सांगितले. तसेच सध्या असलेले वाल्मन यांच्या बदली करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. अनेक ठिकाणी असलेले पाईप लिकेज तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.
सदरच्या मागण्या सध्या स्थितीत मान्य करण्यात आल्या व अंमलबजावणी करण्याचे तात्काळ आदेश प्रशासनाकडून देण्यात आले.

मात्र सुरळीत पाणीपुरवठा व दिलेला शब्द महापालिका प्रशासनाने न पाडल्यास पुन्हा पंधरा दिवसांनी भव्य मोर्चा वसई विरार शहर महापालिकेच्या विरोधामध्ये काढण्यात येणार असल्याचे बहुजन समाज पार्टीचे नालासोपारा विधानसभा अध्यक्ष विष्णू काळू वाघ, आत्माराम पाटील, संजय कांबळे, नईम इद्रीशी, गोविंद शेलार, असलम सवालाखे, जगजीत गरेवाल, अख्तर शेख, संसारे काका या सर्व कार्यकर्त्यांकडून इशारा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *