

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस्, महाराष्ट्र
दहिवडी-प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असताना विनापरवाना बुध ता. खटाव येथे तळेगाव दाभाडे(पुणे) येथून आल्याने इक्बाल कादर शेख व त्याच्या पत्नीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून दैनिक प्रभातचे पुसेगाव प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांना मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, बुध ता. खटाव येथील रहिवासी आमिर शमशुद्दीन शेख व त्याचा भाऊ जहांगीर शमशुद्दीन शेख यांनी पत्रकार प्रकाश राजेघाटगे(रा. बुध) यांच्या घरात जाऊन नातेवाईकांवर गुन्हा नोंद झाल्याची बातमी छापल्याचा जाब विचारात लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. “या हल्ल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून,कोरोना पार्श्वभूमीवर मा.न्यायालयाच्या निकषानुसार दोषींवर कारवाई करण्यात आली असल्याचे”
पुसेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले.
एनयुजेएम सातारा सचिव असणा-या प्रकाश राजेघाटगे यांचे सह जिल्हा कार्याध्यक्ष डाँ विनोद खाडे ,आणि जिल्हाध्यक्ष रूपेश कदम यांनी या कारवाईबद्दल पोलीसांचे आभार मानले.
देश कोरोना संकटाचा मुकाबला करतोय,पत्रकार योद्धा हा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतोय .अशावेळी कायदा मोडणारे लोक जेव्हा पत्रकारांवर हल्ला करतात तेव्हा हा गुन्हा जास्त गडद होऊन हल्लेखोर कडक शिक्षेस पात्र होतो. पत्रकार हा आधार आहे लोकशाही चा!कुणीही असो अशी ठोकशाही सहन करणार नाही आम्ही!
अशांना वेळीच ठीक करणेस कायद्याची ताकद आमचे सोबत आहे!
-शीतल करदेकर, राज्य अध्यक्ष
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस्, महाराष्ट्र