
” बाप्पांचे आगमन “
बाप्पांचे आगमन म्हणजे
क्षण आनंदाचा .
आगमन सोहळा जणु
जल्लोश उत्साहाचा .
बाप्पांच रुप आम्ही मनी,
नयनी भरतो .
बाप्पांना आयुष्यभरासाठी
आशिर्वाद मागतो .
फुलांच्या वर्षावात नाचत
बाप्पा आणले .
जात-धर्म विसरुन सारे
एकत्र आले .
सर्वांनी एकत्र यावे टिळकांनी
गणेसोत्सव सुरु केले .
आजही एकत्र येवुन टिळकांचे
म्हणने जोपासले .
बाप्पा सर्व पुरग्रस्तांचे पुर्नवसन
करा ही इच्छा .
सर्वांना भरभरुन आशिर्वाद द्या
हिच सदिच्छा .
========================

सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची सुरुवात झाली.
आज नायगांव श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट
च्या नायगावचा राजा चा आगमन सोहळा
मा. धरेद्र कुलकर्णी ट्रस्टचे अध्यक्ष याच्या
उपस्थितीत थाटात संपन्न झाला .