वसई प्रतिनिधी
गणपती बाप्पा आले म्हणता गावकरी सज्ज होतात
गावी जायला. या गावकऱ्यांना बस ; ट्रेन ची तिकिट
मिळण मुश्कील होत , या सर्व अडचणींना लक्षात घेवुन बहुजन विकास आघाडीचे आमदार मा. हितेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनात नायगाव पुर्वचे नगरसेवक/ सभापती मा. कन्हैया भोईर यांच्या सहकार्याने कोकणात जाण्यासाठी बससेवा मोफत देण्याच सत्कार्य नायगावचे पुर्वचे अध्यक्ष /समाजसेवक श्री धरेंद्र कुलकर्णीजी गेली सात वर्ष करत आहेत . हि सेवा दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण करण्यात आली . या कार्यात बापाणेचे बविआ अध्यक्ष मा. विलास भोईरजींनी सहकार्य केले . यावर्षी गावी जाणाऱ्यांची संख्या वाढुन 400 वर पोहोचली आहे . बस निघतांना बाप्पा मोरयांच्या गर्जनांनी परिसर दुमदुमला. नायगाव पुर्वचा कोकणवासी या सर्व मान्यवरांना धन्यवाद करत हसत मुखाने प्रवासाला निघाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *