◆ कोकणवासियांचा मनस्ताप वाढला ?

विरार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या अनुषंगाने वाढत जाणारा ‘लॉकडाउन’ यामुळे वसई-विरारमधील नागरिक धास्तावले आहेत. याचाच फायदा उठवत खासगी ट्रैवेल्सनी कोकणात जाण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली आहे; मात्र यासाठी प्रतिमाणसी तब्बल २२०० रुपये बस भाड़े ठेवल्याने कोकणवासियांचा मनस्ताप वाढला आहे.

मागील दोन दिवसांत वसई-विरार शहरात कोरोना फैलावाचा वेग वाढला आहे. त्यामुळे शहरवासियांनी धसका घेतला आहे.

वसई-विरार शहरात कोकणवासियांची मोठी संख्या आहे. हे सर्व लोक येथील चाळी आणि लोडबेअरिंगच्या इमारतींत वास्तव्यास आहेत. कोरोनाचा वाढता फैलाव, त्या अनुषंगाने वाढत जाणारा लॉकडाउन, सोबतच वाढता उन्हाळा, पाणी टंचाई आणि चाळी व इमारतींतील असुविधा यामुळे या लोकांचा गावी जाण्याकड़े ओढा आहे.

या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी काही खासगी ट्रैवल्स सेवा देणार आहेत. मात्र या बसचे भाड़े तब्बल २१०० रुपये असल्याने मोठे कुटुंब असलेल्या कोकणवासियांना मोठा फ़टका बसणार आहे.

या बस भाडयात ट्रैवल्सनी प्रवाशांना वैद्यकीय पास देण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय एका बसमधून २५ प्रवासी नेण्यात येणार आहेत. यात १० वर्षांवरील मुलांनाही हा दर निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान; चिपळूण, लांजा, राजापूर १९००, खारेपाटण, तरळा, कणकवली २१००, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी २२०० असा दर निश्चित करण्यात आला आहे.

परिवहन मंत्री आणि खासगी ट्रैव्हल मालक यांचे काही साटेलोटे आहे का? खासगी ट्रैव्हलला अशी मुभा देऊन परिवहन मंत्री यांनी सामान्य माणसाचे कंबरडे मोडायला घेतले आहे. आज रायगड, चिपलून, रत्नागिरी येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी रिकामी एसटी कोकणात पाठवल्या जात आहेत. पण चालत कोकणात जात असलेल्या लोकांनी हात दाखवला तरी या बस थांबवल्या जात नाहियेत.

यापेक्षा शाळा, कंपनी किंवा स्थानिक स्वराज संस्था यांच्या उभ्या असलेल्या बस घेऊन लोकांना कोकणात वाजवी दरांत सोडता आले असते; पण सरकारला सामान्य कोंकणी माणसाला खडड्यात घालायचेच आहे त्याला काय करणार?

– महेश कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विरार शहर सचिव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *