

नालासोपारा (प्रतिनिधी)- बाळ गोपाळ सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ (रजि)
पास्कोल नगर, आचोळे रोड नालासोपारा पूर्व,माघी गणेश जयंती निमित्त या ठिकाणी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ ते ०७ फेब्रुवारी २०२५ सात दिवस मोठ्या उत्साहात गणेशउत्सव साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रात इच्छापूर्ती श्री गणेश या नावाने मंडळाची ख्याती आहे धार्मिक कार्यातून सामाजिक बांधिलकी या ब्रिद वाक्यवार मंडळामार्फत यंदा रिद्धी विनायक हॉस्पिटल यांच्या माध्यमातून तसेच डॉक्टर श्री वेंकट गोयल यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यात तब्बल ११७ रक्तदात्यानी रक्तदान केले तसेच मंडळीमार्फ़त सालाबादप्रमाणे यंदाही अत्यावशक सेवेत असणारे अग्निशमन दल यातील अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला