
वसई (प्रतिनिधी) : वसई तहसीलदार कार्यालयातील बिनशेती विभागाचे सर्व अधिकार तहसीलदार यांनी स्वतःकडे ठेवत बिनशेती विभागाच्या अपर तहसीलदारांना शोभेचे बाहुले बनवून बसविले आहे ?
यावरून अपर तहसीलदार नाराज आहेत. वसई अप्पर तहसीलदार बिनशेती कार्यलय महसूल विभागातील भाग आहे की नाही हा प्रश्न जनतेला पडला आहे असे वाटते की हा विभाग टपाल घेण्यासाठी आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
अनधिकृत बांधकाम यांना बिनशेती शाखा वसई या कार्यलयातून कोणतेही कारवाई करण्याचे अधिकार यांना उरलेला नाही! वास्तविक कोणत्याही जमिनीत बिनशेती परवानगी देण्यापूर्वी या कार्यालयाचे अभिप्राय घेणे आवश्यक आहे, मात्र तसे न होता वसई तहसीलदार परस्पर बिनशेती आदेश यांच्याकडून घेतात. त्यामुळे शासनाच्या लाखो करोडो चा नुकसान होत आहे.जर खाजगी जमिनीतील बिनशेती आदेश अप्पर तहसीलदार कार्यलय यांच्या कडून झाले तर शासनाचे झालेले नुकसान भरून काढता येईल त्यामुळे मा.जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी