
आज दिनांक १४/१०/२०२२ रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रवींद्र शिंदे, डीवायएसपी काळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत भानुदास पालवे (भाप्रसे) यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला.

बी.एच. पालवे हे या आधी अतिरिक्त विभागीय आयुक्त विभाग नाशिक येथे कार्यरत होते.
जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ (भाप्रसे) यांची सिडको सह व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झाली असून सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, गटविकास अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.