
प्रतिनिधी :
बैसिन कैथॉलिक को. ऑप. बैँकेच्या कर्ज वसुलीच्या जाचाला कंटाळून कर्जदाराने केलेल्या आत्महत्या प्रकरणात वसई पोलिसांकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न करता कर्जदाराच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या बैंक अधिकाऱ्यांना अभय दिले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, रमेश राजेंद्र सिंग यांनी बैसिन कैथॉलिक को. ऑप. बैँकेच्या पापडी शाखेकडून कर्ज घेतले होते. टाळेबंदीच्या काळात त्यांचा व्यवसाय ठप्प झाल्यामुळे त्यांना कर्जाचे हप्ते भरता येत नव्हते. त्यात बैँकेकडून कर्जाचे हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. अखेर त्यांनी आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली जीवन यात्रा संपविली परंतु त्यांच्या मागे त्यांच्या परिवाराच्या हालअपेष्टा चालू आहेत.
रमेश राजेंद्र सिंग यांच्या मृत्यूबाबत वसई पोलिसांनी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. दि. २०/२/२०२१ रोजी रमेश राजेंद्र सिंग यांनी आपली जीवन यात्रा संपविली. या घटनेला ७ महिने उलटून गेले. या संदर्भात त्यांची पत्नी रिटा रमेश सिंग यांनी पोलीस आयुक्त मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, उपायुक्त, पोलीस निरीक्षक वसई यांना पत्र देऊन कारवाईची विनंती केली आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नाही.
सदर प्रकरणात वसई पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल का केला नाही? या बाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी. रमेश राजेंद्र सिंग आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून बैंक अधिकाऱ्यांना अटक करावी.