
बोईसर, वार्ताहर दि.02

पालघर तालुक्यातील सात ठिकाणच्या तलाठ्यांची बदली करण्यात आली असून काही ठिकाणच्या तलाठ्यांनी प्रशासनाचे आदेश न जुमानता पदभार स्विकारण्यासाठी नकार देत गैरहजर राहिले होते. परिणामी प्रांत अधिकारी यांच्या आदेशानंतर जे तलाठी गैरहजर होते तिथे नव्याने येणाऱ्या तलाठ्यांनी एकतर्फी पदभार स्विकारला आहे.
तालुक्यातील ज्या तलाठ्यांना सहा वर्षाचा कार्यकाळ झाला होता अशा तलाठ्यांच्या बदलीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून पडून होता. यातच आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या तलाठी क्षेत्रात पुढेही काम करता याव यासाठी काहींनी तर चक्क बदली होऊ नये यासाठी मंत्र्यांची शिफारस पत्रे देखील आणली होती. याच तलाठ्यांनी दोन वर्षांपूर्वी देखील बदली होत असताना मंत्र्यांच्या दबाव आणुन आपली बदली थांबवली होती. मात्र यावेळी अधिकाऱ्यांनी कोणत्याही कोणत्याही शिफारशीची दखल न घेता नियमानुसार तलाठ्यांच्या बदल्या केल्या. यामुळे नाराज झालेल्या तलाठ्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर न होताच पदभार सोडण्यासाठी देखील गैरहजर राहिले.
बोईसर तलाठी सझा व सरावली तलाठी सझा या तालुक्यातील मोठ्या तलाठी सझा आहेत. याच भागात सर्वांत मोठे अनधिकृत बांधकाम देखील उभे राहिले आहे. सरावली तलाठी साधना चव्हाण यांची बदली झाल्यावर ते पदभार सोडण्यासाठी गैरहजर राहिल्यांने सरावली साठी नव्याने आलेले तलाठी हितेश राऊत यांनी एकतर्फी पदभार स्विकारून आपल्या कामाची सुरुवात केली होती. यातच बदली होऊन देखील पदभार सोडण्यासाठी गैरहजर असलेल्या बोईसर तलाठी यांनी अखेर मंगळवारी आपला पदभार नव्याने आलेल्या उज्ज्वला पाटील यांना पदभार दिला. याविषयी प्रांत अधिकारी विकास गजरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तलाठ्यांची पदभार सोडण्यासाठी गैरहजर असतील तर नव्याने येणाऱ्या तलाठ्यांना एकतर्फी पदभार स्विकारावा असे आदेश दिल्याचज म्हटले आहे. जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांचे आदेश धुडकावून लावणाऱ्या तलाठ्यांची मंत्र्यांन पर्यंत पोहोच असल्याने तलाठ्यांना अधिकच मोकळीक मिळत असल्याचा आरोप नागरीकांन कडुन होत आहे.
- कोणत्याही मंडळ क्षेत्रातील झाल्या बदल्या
बोईसर मंडळ- 3 तलाठी
मनोर मंडळ- 1 तलाठी
पालघर मंडळ- 1तलाठी
आगरवाडी मंडळ- 2 तलाठी