(मनोज बुंधे,पालघर) लॉकडावूनच्या बिकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्र(पालघर) व मध्यप्रदेश(झाबुआ) येथील तब्बल १०९मजूर आपल्या कुटुंबासह बोईसर-MIDC येथे काम बंद झाल्यामुळे अडकून राहिले असताना आदिवासी एकता परिषद पालघर, जिल्हा सचिव डॉ.सुनील पऱ्हाड सर यांनी वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपत सतर्क राहून, वेळोवेळी आढावा घेवून आपल्या पालघर-बोईसर येथील कार्यकर्त्यांद्वारे गरीब, होतकरू मजुरांसाठी मदतीचा हात दिला आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्यामुळे येथील या सर्व मजूर, स्रिया व लहान बालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीचा आढावा घेवून पालघर आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्या किर्ती निलेश वरठा(माहीम) यांनी विशेष प्रयत्न करून या गरीब मजूर कुटुंबियांना आदिवासी विकास प्रकल्प डहाणु चे प्रकल्प अधिकारी तसेच एस.डी.ओ.डहाणु (IAS) आणि क्रिस्टी, दिव्या (नवी मुंबई) आल्मा (बंगलुरू) व अक्षय जनसाहस डेवलपमेंट सोसायटी (पालघर) अशा विविध सेवाभावी संस्था, NGO यांच्या मदतीने सर्वांसाठी तांदूळ, डाळी, पीठ, मसाले, रेशन, साबण, डिटर्जेंट पावडर, आयोडेक्स-विक्स डबी, चाय पाउडर, साखर, तेल, खोबरेल तेल, टूथपेस्ट, हळद पावडर, बटाटे, भाजीपाला गृहोपयोगी वस्तू, जीवनावश्यक सामान मिळवून देण्यासाठी सेवाभावी वृत्तीने पुढाकार घेतला आहे.

पालघर ग्राऊंडटीममध्ये बाळकृष्ण धोडी व साथी (खैरापाडा, बोईसर) राकेश खानजोडे, मिलिंद वाडू(पास्थल), गोटू पुजारी, रवी भोईर(पालघर) हे सर्व आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते या बिकट व कठीण परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी मदतकार्य करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे त्या सर्व टीमचे सर्वत्र कौतुक, प्रशंसा, आभार होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *