
विरार : शासनाने जिल्हा आरोग्य प्रशासन आणि स्थानिक महानगर पालिका यांना बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी सन २००० मध्ये कारवाई पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पण जिल्ह्यपासून स्थानिक पातळीवर असे कोणतेही पथक कार्यरत नसल्याने शहरात बिनदिक्कत आपली दुकाने थाटत आहेत. महापालिका स्थापनेपासून पालिकेन केवळ ६१ बोगस डॉक्टर आणि दोन रुग्णालयांवर कारवाई केली आहे. वसई विरारमध्ये तोतया डॉक्टर सुनील वाडकर यांचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. १४ वर्षे हा बोगस डॉक्टर पालिका, जिल्हाआरोग्य विभाग आणि नागरिकांची फसवणूक करत दोन मोठी रुग्णालये चालवत होता. पण या प्रकरणानंतर शहरातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात केवळ ११३० दवाखाने, ३६० रुग्णालये आणि १३९ आरोग्य चिकित्सा केंद्र नोंदणीकृत आहेत. शहरात केवळ १५ ते २० एम.बी.बी.एस. डॉक्टरआहेत. तर एम.डी. डॉक्टरांची संख्या ७० ते ८० आहेत. यामुळे लोकांना होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे. नोंदणीकृत होमिओपॅथीक डॉक्टरांची संख्या ३४० असून आयुर्वेदिक ४५० हून अधिक डॉक्टर आहेत.
वसई विरार परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा असल्याने अनेक बोगस डॉक्टर शहर तसेच ग्रामीण भागात आपले दवाखाने सुरू करत आहेत. यात प्रामुख्याने चाळीच्या परिसरात आपली दुकाने थाटत आहेत. नालासोपारा संतोष भुवन, पेल्हार, विरार चंदनसार, वालीव, भोईदापाडा, मोरेगाव, हनुमान नगर, बिलाल पाडा, पांडय़े नगर, धानीव बाग, वाकणपाडा, अशा काही परिसरात मोठय़ा प्रमाणत अनेक डॉक्टर आपले दवाखाने रुग्णालये उघडून बसली आहेत त्यांची कोणतीही नोंदणी महापालिकेकडे नाही आहे.महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांनी बोगस वैद्यकीय व्यावसायीकांवर प्रतिबंध लावण्यासाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती गठन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीने बोगस बोगस वैद्य्कीय व्यावसायीकांची माहिती पोलिसांना उलब्ध करून पोलीस यंत्रणेने गुन्हे दाखल करण्याचे सांगितले आहे. समितीने बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यावर कारवाई करावी. त्याची माहिती दर महिन्याला जिल्हा दंडाधिकारी तसेच पुनर्विलोकण समितीला सादर करावी. असे आदेश दिले आहेत.पण अशा कोणत्याही प्रकारची समिती जिल्हापातळीवर अथवा महानगरपालिका स्तरावर कार्यरत नाही आहे. यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात तोतया डॉक्टर आपली खडगी भरत आहेत. यासंदर्भात पालिका वैद्य्कीय विभागाने करोना वैश्विक महामारीचे कारण पुढे करत स्वताची बाजू सांभाळली आहे तर जिल्हा वैद्यकीय विभागाने कुणाच्या तRारीवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने शहरात आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टर आपली दुकाने उघडत असल्याची खंत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली आहे.करोना काळात बोगस डॉक्टरांवरील कारवाई बंद होती, पण लवकरच आम्ही वैद्यकीय विभागासह मोहीम राबविणार आहोत. पण असे विशेष पथक कार्यरत नाही.–संतोष दहेरकर, अतिरक्त आयुक्त, वसई-विरार शहर महापालिका यांनी सांगितले.नागरिकांच्या तक्रारीवरुन आतापर्यंत कारवाया केल्या जात होत्या. पण लवकरच विशेष पथके स्थापन केली जाणार असून बोगस वैद्य्कीय व्यवसाय करणारम्य़ांवर कारवाई केली जाईल.–डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा वैद्यकिय अधिकारी यांनी सांगितले.