

सोमवारी रात्रीच्या सुमारास लेन्सन कोतवार यांनी आपल्या भाड्याने दिलेल्या बोटीवर काम करणारा सांन्तु बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी दाखल केली होती. पोलिसांनी आरोपी रामस्वामी भुवणेशवर याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने सांन्तुच्या डोक्यावर जाळे ओढण्याचा लोखंडी रॉडने मारून हत्या केल्याचे कबुल केले.
पालघर – उत्तन परिसरातील एका बोटीवर मदत न करता बडबड करतो, म्हणून सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांन्तु राम हरिराम (वय ३४) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी उत्तन सागरी किनारा पोलिसांनी आरोपी रामस्वामी भुवणेशवर श्रीवास (वय २८) याला अटक केली आहे. एस निकम, सहाययक पोलीस निरीक्षक, उत्तन सागरी पोलीस ठाणे )सोमवारी रात्रीच्या सुमारास लेन्सन कोतवार यांनी आपल्या भाड्याने दिलेल्या बोटीवर काम करणारा सांन्तु बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी दाखल केली होती. यानंतर, पोलीस सांन्तुचा शोध घेत असताना त्यांना समुद्रात ‘प्रलयकर’ बोटीच्या केबिनमध्ये .ळकाही रक्ताचे डाग दिसून आले. अधिक शोध घेतला असता, जेटी बंदरापासून १५० किमी अंतरावर पोलिसांना एक मृतदेह तरंगताना आढळून आला. यावरून त्याला बोटीतच मारून नंतर पाण्यात फेकून दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.