

प्रतिनिधी : बोळींज सम्राट अशोक नगर येथे वसई-विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान स्थापित यशोधरा वस्तीस्थर संघ, बोळींज यांचे संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना स्वस्थ परिवार आरोग्य शिबीर व पोषण योजना मार्गदर्शन शिबिर शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सम्राट अशोक नगर, बोळींज येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मा. माया चौधरी, प्रभाग समिती सभापती मा. सखाराम महाडीक, नगरसेवक अजित नाईक, माजी नगरसेविका सिमा काळे व SMID मा. विभा जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशोधरा वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा निलम जाधव ह्यांनी केले. त्यामध्ये त्यांनी यशोधरा वस्ती स्थर संघाच्या कामाचा थोडक्यात आढावा घेतला. त्याचप्रमाणे पोषण योजना प्रभावीपणे कशी राबविता येईल याबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना स्वस्थ परिवार आरोग्य योजना सविस्तरपणे सादर केली. सदर आरोग्य शिबिरात वस्ती स्थर संघाच्या महिलांच्या परिवारातील सदस्यांनी व परिसरातील लोकांनी आपल्या आरोग्य तपासणी करून घेतली. सदर आरोग्य शिबीरामध्ये शासकीय रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी लोकांची तपासणी केली. महिला व बालकल्याण सभापती मा. माया चौधरी यांनी महिलांनी राबविलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली व अशा लोकोपयोगी कार्यक्रमास सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित असणार्या सर्व मान्यवरांनी वस्ती स्थर संघाचे अभिनंदन केले व असे कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला व लहान मुले उपस्थित होती. पोषण योजना कार्यक्रमावेळी यशोधर् वस्ती स्थर संघातर्फे लहान मुलांना खजुर, चिक्की, पुरणपोळी व शेंगदाणे यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्येने महिला व लहान मुले उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपाली भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशोधरा वस्तीस्तर संघाच्या सचिव कुंदा जाधव व सर्व महिलां सदस्यांनी विशेष योगदान दिले.