
खाड़ी पात्रात 15 फूट मध्ये भिंत व भराव करून अतिक्रमण.
दिलेल्या परवानगीच्या शर्ती चा भंग केल्याने स्थगिती.
भाजपचे मनोज पाटील यांनी या बेकायदेशीर कामा विरोधात उठवला आवाज.
खाड़ी पत्रातील अतिक्रमण काढून बिल्डर व ठेकेदार यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून परवानगी रद्द करण्याची मनोज पाटील यांची मागणी.
खाड़ी किनारी असलेल्या 22 झाडांची बेकायदेशीर रीत्या कत्तल .
विरार पश्चिम बोळींज खारोडी येथील मेंफेयर हाऊसिंग ( विरार गार्डन) च्या सुरू असलेल्या संकुला साठी 20 मीटर रुंद रस्ता बनवण्यासाठी महापालिकेने विकासकाला परवानगी दिली होती. सदर परवानगी देताना विविध शर्ती आणि अटी घालण्यात आल्या होत्या त्यात प्रामुख्याने 1) अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक खाड़ी प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही तसेच 2) रस्ता 20 मीटर रुंदीचा असेल. अश्या प्रमुख अटी होत्या.
परंतु प्रत्यक्षात या सर्व शर्तीचे सर्रास उल्लंघन करत विकासक व ठेकेदार यांनी मनमानी करत खाड़ी पत्रात 15 ते 17 फूट अतिक्रमण करून भिंत घालून भराव केला, व त्यात रस्ता निर्माण करण्याचे काम सुरू केले. तसेच पूर्वी खाड़ी किनारी असलेली पूर्ण वाढ झालेली जवळपास 22 झाडे बेकायदेशीर पणे काढून ती खाड़ी पात्रात अक्षरशः फेकण्यात आली.
या सर्व प्रकाराबाबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी समाज माध्यमातून वाचा फोडली व हा प्रकार महापालिका बांधकाम विभाग व आयुक्तांच्या नजरेस आणून दिला व तातडीने कारवाईची मागणी केली.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने काम थांबवण्याची लेखी नोटिस बांधकाम विभागामार्फत देण्यात आली.
इतक्या मोठ्या प्रमाणात खाडीमध्ये अतिक्रमण व भराव तसेच परवानगीचे उल्लंघन होत असताना महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच महसूल प्रशासन नक्की काय करत होते? असा प्रश्न मनोज पाटील यांनी उपस्थित केला.
या वर्षी बोळींज खारोडी ते जकात नाका रस्ता अनेक दिवस पाण्याखाली गेला होता वसई विरार मधील हा एकमेव रस्ता पाण्याखाली होता याचे प्रमुख कारण हे खाड़ी मधील भराव हे होते.
या सर्व प्रकरणात खाड़ी पात्रातील भिंत तसेच भराव तातडीने काढून टाकण्यात यावा तसेच दोषी ठेकेदार बिल्डर व महापालिका बांधकाम विभागातील अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणी मनोज पाटील यांनी केली आहे.