
मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री) यांच्या आदेशानुसार रिपाई मालाड तालुका अध्यक्ष मा. सुनिल गमरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मिथल उमरकर यांनी भर चौकात आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ता अरविंद बनसोडला विष देऊन हत्या गेली. या घटनेला एक महिनाच्यावर कालावधी झाला असून अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली नाही. या घटनेवरून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का?
आरोपींना त्वरित अटक करा, हे सरकार दलित विरुद्ध असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
बौद्ध व दलितांवर वाढते जातीय अन्याय अत्याचारातील आरोपी व भारतीयांचे श्रद्धास्थान राजगृहावर केलेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपी यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयावर बोरीवली पश्चिम मुंबई येथे मा. तहसीलदार विनोद धोत्रे यांना निवेदन देऊन शेकडो कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उग्र निदर्शने केली.
या निदर्शनास रिपाई नेते प्रकाश बनसोडे तसेच विद्यार्थी नेते संदीप केदारे, जिल्हा अध्यक्ष सुरेश टीके यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तालुका संघटक शंकर वाकळे, रामा मोरे, वाॅर्ड अध्यक्ष कुंडलिक डोके, जिल्हा उपाध्यक्ष रामराव खंडागळे, प्रकाश दाहिजे, सुनील मगर, शालिनीताई गवई, लता उघडे, अजित पवार, सिद्धार्थ हिवाळे, नारायण वारकरी, कैलास आखाडे, प्रवीण जाधव, किरण जाधव, हे सुद्धा उपस्थित होते.