
वसई /वार्ताहर : कमी दाबाच्या वीज प्रवाहामुळे वैतागलेल्या नवाळे ग्रामस्थांना नवीन ट्रांसफार्मर चा मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून नवाळे ह्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावाला कमी व्होल्टेज चा त्रास जाणवत होता. मे महिन्यात एसी तर सोडा फॅन ही खूप हळू चालायचा.लॉक डाऊन च्या दोन दिवसा अगोदर सिलू परेरा यांच्यासह नवाळे ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा करून ट्रान्सफॉर्मर उभे करण्याचे काम ही पूर्णत्वास नेले. लॉकडाऊनमुळे काम बंद पडले होते.काही दिवसांपूर्वी लॉक डाऊन थोडे सैल झाल्यावर सोशल डिस्टन्स राखून अखेरीस ट्रान्सफॉर्मर चे काम पूर्णत्वास नेण्यात आले.
ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या संपूर्ण कालावधीत सिलू परेरांचा फॉलोअप जबरदस्त राहिला. वेळोवेळी विद्युत अभियंता शिंदेशी संपर्क ठेवला आणि त्यांना काम करावयास फार मोलाचे सहकार्य परेरा यांनी केले.
त्याचप्रमाणे भावी उमेदवार बबन लोपीस ह्यांनीही ट्रान्सफॉर्मर साठी स्वतःचे मजूर दिले, वेळोवेळी अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी महापालिकेची लिफ्टर गाडी मागवली आणि जातीने उभे राहून काम करवून घेतले. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर बसविण्यापासून ते चालू करण्यापर्यंत परेरा,लोपीस आणि नगरसेविका संगिता राऊत तसेच ज्या ज्या सर्वांनी हातभार लावला त्या सर्वांचे नवाळे गावपरिवारातर्फे आभार मानण्यात आले