
केंद्रीय पर्यटनमंत्री सन्मा. श्रीपाद नाईक यांची विशेष उपस्थिती!
‘प्रतिक्षा पुरस्कार 2022’ने केले जाणार सम्मानीत
वसई: भारतीय जनता पार्टी व प्रतिक्षा फाउंडेशनकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी, 16 ऑक्टोबर 2022 रोजी ‘ओणम व दीपावली स्नेह संम्मेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मागील 20 वर्षांपासून भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार या कार्यक्रमाचे दरवर्षी वसईत आयोजन करतात. दरवर्षी कार्यक्रमास विविध राज्यातून तसेच महाराष्ट्र भरातून विशेष अतिथी कार्यक्रमास येत असतात. दरम्यान, यावर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महानुभाव यांचा ‘प्रतिक्षा पुरस्कार 2022’ने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये केंद्रीय पर्यटनमंत्री सन्मा. श्रीपाद नाईक, राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित (कॅबिनेट मंत्री दर्जा), जम्मू काश्मीरच्या भाजपा नेत्या डॉ. हिना भट, , पालघर जिल्हा खासदार राजेंद्र गावित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘प्रतीक्षा पुरस्कार 2022’ने किल्ले संवर्धक श्रीदत्त राऊत, सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर नाईक, डॉ. अलमास खान, अभिनेत्री निशा परुळेकर, चित्रकार सुभाष गोंधळे, जागतिक महिला बॉडीबिल्डर स्नेहा पाटील, डॉ. राहुल भांडारकर, शिल्पकार सिक्वेरा बंधू, माजी आयपीएस अधिकार रीशीराज सिंग, राजकीय विश्लेषक श्रीजित पणीकर, उद्योजक ओपी सिंग, उद्योजक एस. एस. नायर, रिपोर्टर अपर्णा कार्थिकेय, रिपोर्टर सीजी उमेश, डॉ. हरी वासुदेव, समाजसेवीका तुषारा, डॉ. टीके जयकुमार, समाजसेवक रणजित नायर, ऍक्टिव्हिस्ट सुकन्या कृष्णा, रोहित गायकवाड आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.
आयोजक उत्तम कुमार यांनी, वसईतील विविध समाजाच्या संस्थांना आग्रहाचे निमंत्रण देऊन प्रोत्साहन देण्याची विनंती केली आहे.