वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडीत यांची प्रमुख उपस्थिती

वसई : भारतीय जनता पक्षाच्या ४५व्या स्थापना दिनानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश, केरळ प्रकोष्ट चे संयोजक उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वसईत अनेक ध्वजारोहण, राष्ट्रीय चेतना महापुजा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. वसईत शास्त्रीनगर कार्यालय येथे झेंडे लावून सजवण्यात आले होते. सकाळी प्रथम भारतीय जनता पक्षाचा झेंडा भाजपा शास्त्रीनगर कार्यालय येथे फडकवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय चेतना महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडीत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष भट्टे, हरेश्वर नाईक, प्रज्ञाताई कुलकर्णी, प्रभाकर पाटील, शेखर धुरी, योगी शर्मा, प्रदीप भार्गव आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उत्तम कुमार यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, जेव्हा वसईत भाजपाची सुरुवात होती तेव्हा, येथील माफियाशाहीला घाबरुन भाजपामध्ये येण्यास कोणी ही तयार नसायचे तेव्हा याच कार्यकर्त्यांनी गुंडशाही विरोधात वसईत प्रथम भाजपा झेंडा घेतला व पक्षाचा प्रचार केला. आज आलेले यश हे यांनी त्यावेळी लावलेल्या रोपट्याचे रुपांतर एका मोठ्या वृक्षात झाले आहे. त्यामुळे यांना विसरुन आपणाला केव्हाच चालणार नाही. असे यावेळी ते म्हणाले.
वसईतील या उत्सवामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षवाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार यांवेळी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा पदाधिकारी सिध्देश तावडे, शेमल अजगिया, एच आर सकसेना, श्रीकुमारी मोहन, सुरेश प्रजापती, रिशी व्होरानी, सिमा सागर, मॅथ्यू कोलासो, बाळा सावंत, उषा सावंत, उषा अमिन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *