
वसई: सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या समारोप अंतर्गत भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार, 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता शास्त्रीनगर, मध्यवर्ती कार्यालय येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नवघर आरोग्य केंद्राच्या प्रमुख अलमास खान यांची विशेष उपस्थित लाभली. यावेळी आरोग्य केंद्राकडून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांच्या सोबत चहापान करून गप्पा रंगल्या.
उत्तम कुमार, यांनी यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले. ययावेळी रमेश पांडे, विनेश नायर, श्रीकुमारी मोहन आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.