

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश भाजपाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत(दादा)पाटील,भ.वि.आ.चे प्रभारी मा.श्रीकांत भारतीय यांच्या सुचनेनुसार आघाडीचे प्रदेश संयोजक मा.आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात भाजपा भटके-विमुक्त आघाडीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यात वंजारी समाजाचे युवा नेते संतोष आव्हाड यांची चौथ्यांदा प्रदेश सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली.
सर्व समाज समावेशक संघटनात्मक बांधणी करून भटके-विमुक्त समाजातील समाजघटकांच्या न्याय हक्कासाठी आव्हाड गेली वीस वर्षे काम करत आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भटके विमुक्तांसाठी असलेले महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक विकास महामंडळावर ते संचालकही होते.
सर्व जाती-जमातीतील समाज बांधवांना सोबत घेऊन शहरांबरोबरीने गावोगावी भटके विमुक्तांचे संघटन मजबूत करण्यासाठी ते जानले जातात.
भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाने दिलेली जबाबदारी भटके-विमुक्त समाजाच्या अडीअडचणी समस्या सोडवून समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करून नेतृत्वाची निवड सार्थ ठरवू असं मनोगत संतोष आव्हाड यांनी व्यक्त केलं.