

वसई : भारतीय जनता पार्टी वसई रोड महिला मोर्चा तर्फे महिला मोर्चा अध्यक्ष श्री कुमारी मोहन यांच्या नेतृत्वाखाली नवरात्री निमित्त वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्र वसई येथे ‘नवदुर्गा सन्मान संकल्पना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ महिलांचा शाल-श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आशा वर्कर्स, डॉक्टर, नर्स, महिला पोलीस, लॅबरोटरीच्या महिला स्टाफ, हॉस्पिटलच्या महिला सफाई कामगार यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, आरोग्य केंद्राच्या प्रमुख अलमास खान, जिल्हा महासचिव उत्तम कुमार, रानगावच्या सरपंच सरपंच वैशाली घरत, पोलीस कर्मचारी दीपा भिसे, वसई रोड मंडळ महासचिव रमेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रज्ञा पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना, महिलांनी चूल-मूल यासंकल्पनेतून बाहेर येणे गरजेचे आहे. आज भाजपाच्या माध्यमातून केले जाणारे सत्कार हे आमच्या माध्यमातून आपण समाजासाठी दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. असे त्या म्हणाल्या.
उत्तम कुमार यांनी बोलताना, वसई तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमच्या माध्यमातून जेवढ्या गरजेच्या वस्तू आरोग्य केंद्रांना देता येथील तेवढ्या देण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या माध्यमातून मी केला आहे. कोरोनाकाळात गाव खेड्यापाड्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची भूमिका मोठी होती. व तेथील परिस्थिती ओळखून मी हा उपक्रम हाती घेतला. खास करून घरोघरी जाणाऱ्या आशा वर्कर्स ना साहित्य पोहोचवण्याचे माझे ध्येय होते. त्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. यापुढे यथाशक्ती प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. असे ते म्हणाले.
श्रीकुमारी मोहन यांनी यावेळी बोलताना, कार्यक्रमास उपस्थित सर्व पाहुणे व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. व यापुढे ही महिलांसाठी भाजपा वसई रोड महिला मोर्चा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यासाठी मला केव्हा ही संपर्क करा असे त्या म्हणाल्या.
यावेळी संचालन शोभा नेगी यांनी केले. वसई रोड मंडळ महिला मोर्चा महासचिव हर्षा फनविया यांनी आभार प्रदर्शन केले. अंजली सोलंकी यांनी प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमास मोठ्याप्रमाणात भाजपच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
