

वसई : भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 16 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या “सेवा सप्ताह” चा समारोप आज शुक्रवार दि. 20 रोजी वसईतील आदिवासी भागातील कलाटीपाडा येथील आदिवासी समाजासाठी मेडिकल कॅम्प आयोजित करून व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करून होणार आहे.
वसईत भाजपा वसई रोड मंडळाकडून मागील चार दिवस झाले वसईतील विविध भागात “सेवा सप्ताह” च्या माध्यमातून समाज उपयोगी कामे मंडळाकडून चालू आहेत. 16 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या “सेवा सप्ताह” मध्ये पहिल्या दिवशी वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण केले गेले त्याच दिवशी दुपारी 12 वा. दरम्यान वसई रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबवले गेले. दुसऱ्या दिवशी माणिकपूर येथील जिल्हापरिषद शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप व शाळा परिसरात वृक्षारोपण केले गेले. तसेच तिसऱ्या दिवशी उमेळमान येथील जिल्हापरिषद शाळेमध्ये वह्या वाटप व वृक्षारोपण केले गेले. तर चौथ्यादिवशी सेंट पीटर शाळेमध्ये वृक्षारोपण व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले
भारतीय जनता पार्टी कडून संपूर्ण देशभरात हा “सेवा सप्ताह” साजरा करण्याचे आदेश पक्षाकडून सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. ज्यामध्ये स्वच्छता हीच सेवा, सिंगल युज प्लास्टिक पासून मुक्ती व पाण्याचे संरक्षण व संवर्धन हे विषय समाजापर्यंत पोहोचवावे असे सांगण्यात आले होते.