

◆ खासदार राजेंद्र गावित यांच्या विशेष उपस्थितीत प्रांतअधिकारी स्वप्नील तांगडे व तहसीलदार किरण सुरवसे यांनी मानले आभार
भाजपा वसई रोड मंडळाकडून मागील महिन्याभरापासून वसई तालुक्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात तांदूळ, डाळ, मसाले, तेल आदींचे किट वाटप केले गेले. त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात आज भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाच्या माध्यमातून आज तांदूळ व डाळ चे 500 “नमो किट” वसई तालुक्याचे प्रांत अधिकारी स्वप्निल तांडेल व तहसीलदार किरण सुरवसे यांना पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या विशेष उपस्थित सुपूर्त केले. यावेळी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी या मदती बद्दल खासदार गावित व मंडळ अध्यक्ष उत्तम कुमार यांचे आभार मानले.
उत्तम कुमार यांनी यावेळी माहिती देताना, भाजपा वसई रोड मंडळाकडून मागील महिन्याभरापासून चाललेल्या या उपक्रमामध्ये तांदूळ व डाळ मिळून तब्बल 17,000 किलो चे वाटप मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच वाढते कोरोना रुग्ण पाहता वसईतील डॉक्टरांच्या आरोग्याच्या दृष्टीने वसईमधील सर्व हॉस्पिटलमध्ये प्रोटेक्शन किट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच यामध्ये वसई रोड मंडळाच्या भाजपा इंडस्ट्रीयल सेल व एस जे पटेल परिवार, भाजपा व्यापारी आघाडीची तसेच अनेक दानशूर व्यक्तींची मोठी मदत मिळाली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजपा ज्योतिष नामबीयर, रितेश सत्यनाथ, रमेश पांडे, नागेश शेट्टी, ज्ञानेश्वर पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.