वसई : वसई-विरारच्या जिल्हाध्यक्ष पदी नालासोपार्‍याचे राजन नाईक यांची वर्णी लागल्यानंतर काल भाजपा वसई रोड मंडळककडून अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राजन नाईक यांचा शुभेच्छा व नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा वसई रोड कार्यालयात राजन नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्याप्रमाणात मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरीक उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी उपस्थितांना संबोधित करताना, यापुढे माझा अधिक भर हा पक्षाच्या बुथ लेवल पासून संघटनात्मक कार्यावर असेल असे ते म्हणाले. वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक लागण्याच्या मार्गावर आहे. वसई-विरार महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवणे हेच एकमेव धैय्य माझे आहे व आपल्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही तेच धैय्य असले पाहिजे. पक्षाने दिलेले प्रत्येक कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.कार्यक्रमाचे आयोजक व मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, वसई-विरारला राजन नाईक यांच्या रुपाने एक सशक्त असा जिल्हाध्यक्ष भेटला आहे व याचा फायदा भविष्यात येणार्‍या महानगरपालिका निवडणूकीत प्रत्येक उमेदवाराला होईल. वसई-विरार महानगरपालिकेमध्ये एका हाती सत्ता असलेला बविआ हा गुंडपक्षाचे कमी दिवस उरलेले आहेत. या निवडणुकीत त्यांचा निश्‍चित पराजय हे सांगण्यासाठी कोणा भविष्यकाराची गरज नाही. बविआ व त्यांच्या एकाही सत्ता असलेल्या महानगरपालिकेच्या कृपेमुळे बुडालेली वसई व त्यामुळे वसई-विरारकरांचे झालेले नुकसान तसेच बविआच्या नगरसेवकांच्या कृपेमुळे वाढलेली अनधिकृत बांधकामे हे वसईकर विसरलेला नाही. असे ते म्हणाले.
कार्यक्रमास भाजपा वसई-विरारचे वरिष्ठ नेते हरेंद्र पाटील, शेखर धुरी, मनोज बारोट आदी उपस्थित होते. यावेळी वसई रोड मंडळाकडून ज्योतिष नांबियार, मार्टीव कोलासो, विनोद कुमार, अपर्णा पाटील, श्रीकुमारी मोहन, कांचन जहा, रमेश पांडे, लालजी कनोजिया, महेश सरवणकर, महेंद्रसिंग कोली, मारुती कुटुकडे, कल्पेश चव्हाण, अरविंद मोर, सुरेश प्रजापती, ज्ञानेश्‍वर पवार, विद्याधर शेलार, संध्या सिंग, सुधांशु चौबे, विनोद नायर, राजकुमार तिवारी, हिरेन पटेल, अर्जुन ईंगोले, राजेश दोषी, उषा आमीन, कामिनी सिंग आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामानुजम यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपाळ परब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *