
अनेक वर्षापासून पेल्हार येथील पलशाचा पाडा, वानोठा पाडा , डोंगरी पाडा , मनीचा पाडा , शीवेचा पाडा , दमेल पाडा नागरिकांना पाण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.केंद्र शासन यांच्या कडून अमृत योजने अंतर्गत नागरिकांच्या घरोघरी पाणी नळ कनेक्शन देण्याचे शासन परिपत्रक काढून सुधा वसई विरार शहर महानगरपालिकेत मात्र ह्या शासन परीपत्रकचे अद्याप अमलबजावणी करण्यात आलेली नाही.शासन निर्णयानुसार अमृत योजनेची तालुक्यात अमलबजावणी व्हावी यासाठी आश्विन सावरकर यांनी आपले सरकार ह्या पोर्टल वर तक्रार दाखल केली होती.तसेच आयुक्त यांना अनेक वेळा निवेदने ही देण्यात आली आहे.
आश्विन सावरकर यांनी आपले सरकार ह्या पोर्टल वर तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्त यांनी पेल्हार येथील पलशाचा पाडा, वानोठा पाडा , डोंगरी पाडा , मनीचा पाडा , शीवेचा पाडा , दमेल पाडा ह्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती एफ , पेल्हार च्या पाणी पुरवठा विभागाने सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केलेला आहे व त्या अनुषंगाने निविदा तयार करून पुढील मान्यता घेण्यात येणार असून लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल असे पत्र आयुक्त यांनी आश्विन सावरकर यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
