
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत भाबोळा नाका ते डी मार्टपर्यंत सार्वजनिक रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून अधिकारी व गावगुंडांची अवैध वसुली चालू आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून बाजार कर वसुली केली जात नसल्याचे समजते.या बाबत अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत भाबोळा नाका ते डी मार्टपर्यंत सार्वजनिक रस्त्यावर शेकडो फेरीवाले फेरीचा अवैध धंदा करतात. या फेरीवाल्यांकडून महानगरपालिकेचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्ते, परिसरातील गावगुंड अवैध वसुली करतात. या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच पादचाऱ्यांना अडचण होते. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगला मलिदा मिळत असल्यामुळे या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. तरी आयुक्तांनी सदर प्रकरणी कारवाई करावी.