वसई – प्रतिनिधी – मागील 70 वर्ष भारताला एक संघात बांधून ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाने केले आहे असे संविधान प्रती गौरव उद्गार शिवाजी बाबुराव माने मेकॅनिकल इंजिनियर यांनी रविवारी दिनांक 29 नोव्हेंबर 2020 रोजी पंचशील क्रांती मित्र मंडळ सिद्धार्थ नगर वसई पश्चिम येथे आयोजित केलेल्या संविधान गौरव दिनाच्या वेळी प्रमुख वक्ता म्हणून काढले आहेत.
रविवारी संध्याकाळी 6 वाजता येथील पंचशील क्रांती मित्र मंडळाने सोशल डिस्टसिंग आणि मास्क परिधान करून येथील बौद्ध विहारात संविधान गौरव दिन साजरा केला या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी माने हे प्रमुख वक्ते होते त्यांच्या सोबत कुंदन खंडागळे आणि न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य माणिक दुतोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक पूजेने झाली. पाहुण्यांचा परिचय धर्म गुरुजी चरण घायवट यांनी करून दिला. प्रास्ताविक मध्ये मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरुण घायवट यांनी संविधान निर्मिती आणि त्याचा देशाला झालेला फायदा हे अनेक उदाहरण देऊन सांगितले. ज्या प्रमाणे पृथ्वी गुरुत्वाकर्षण शक्तीवर उभी आहे त्या प्रमाणे देश अखंडित पणे उभा आहे तो या संविधानावर संविधान नसते तर देशाचे तुकडे झाले असते हे सोदाहरण दाखवून दिले. यावेळी संविधाना मधील उद्धेशिकाचे वाचन चित्रा घायवट यांनी केले. प्रमुख वक्ते शिवाजी माने यांनी संविधाना मुळे देश एक संघटित पणें उभा आहे. संविधानातील काही कलमे आणि उद्धेशिकेमधील काही शब्दा चे अर्थ समजावून सांगितले. प्राचार्य दुतोडे सरांनी संविधानामुळे प्रगतीची दारे खुली कशी झाली हे स्वानुभवाने सांगितले. कुंदन खंडागळे यांनी देखील संविधान गौरव दिना बाबत समायोजित वक्तव्य केलं. तर महिला मधून शिक्षिका संध्या गायकवाड यांनी संविधान महिलांना कसे तारणहार आहे हे सांगत कश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत संविधान संकटाच्या वेळी तारुन कस नेतो हे उपस्थितांना दाखवून दिले. या कार्यक्रमासाठी पंचशील क्रांती मित्र मंडळाचे उपाध्यक्ष रेश्मा आपटेकर, सल्लागार हेमंत जाधव, प्रकाश जाधव ,दैनिक आपल्या उपनगरच्या संपादिका अनिता घायवट, शाखेचे अध्यक्ष नितीन जाधव, शरद तिगोटे, यशवंत मोहिते , विजय तांबे मोरेश्वर मोहिते आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *