
वसई : भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाचे वार्षिक स्नेह सम्मेलन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे, सत्कार, कार्यक्रमाचे आयोजक व भाजपा वसई रोडचे अध्यक्ष उत्तम कुमार यांच्या कार्याच्या कार्यअहवालाचे प्रकाशन अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. केरळचे राजा शशिकुमार वर्मा तसेच भाजपाच्या काश्मीर नेत्या हिना शाफि भट, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, माजी आमदार भाजपा नेते हेमेंद्र मेहता, दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक ए. के. सुनील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच भाजपा प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी, भाजपा नालासोपारा सरचिटणीस मनोज बारोट, जिल्हा उपाध्यक्ष प्रज्ञा पाटील, विभाग उपाध्यक्ष प्रतिभा पाध्ये आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात साडेसात लाख कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांचा केरळचे राजा शशिकुमार वर्मा यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
केरळचे राजा शशिकुमार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, शबरीमाला मंदिर मधील महिला प्रवेश आंदोलनामध्ये अयप्पा स्वामी भक्तांवर कम्युनिस्ट सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचा निषेध व्यक्त केला. भाजपा काश्मीर नेत्या हिना भट यांनी बोलताना, मी काश्मिरी मुसलमान आहे मी ज्या श्रीनगरमध्ये राहते तेथे 100% काश्मिरी मुसलमान आहेत. व ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मिरच्या उजवल भविष्यासाठी कलम 370 व 35 ए हटवल्यानंतर तेथील जनता आनंदी आहे. हे मी जबाबदारीने सांगते आहे, असे त्या म्हणाल्या. काही फुटीरतावादी नेत्यांना नजर कैदेत ठेवले असल्याने त्यांच्याकडून जाणीवपूर्वक काश्मिरची शांतता भंग करण्यावर चाप बसला आहे. व त्यांच्याकडून स्थानिक मुलांकडून दगडफेक सारखे प्रकार करून घेणाऱ्यांना भाजपा सरकारने चांगलीच चपराक लावली आहे. असे त्या म्हणाल्या!
यावेळी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेल्या मान्यवरांना ‘प्रतीक्षा ट्रस्ट’च्या माध्यमातून पुरस्कारीत करण्यात आले. यामध्ये दाक्षिणात्य कादंबरीकार वी. आर. सुधीष, चित्रपट कथा लेखक क्षत्रुखणन, व्यंगचित्रकार रजींद्र कुमार, ज्योतिष व आध्यात्मिक गुरू पी. के. सहदेव कुरूप, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया मेनन, समाजसेवक कृष्णन कुट्टी नायर, वसंत शहा, निलेश भातुसे, वसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरीष्ठ डॉ. अलमास खान आदीना सन्मानीत करण्यात आले.
तसेच वसईतील जनतेच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा कामगार नेते व दै. मुंबई मित्र व वृत्त मित्र दैनिकांचे समहू संपादक अभिजीत राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्यामध्ये, अनिलराज रोकडे, वैष्णवी राऊत, विजय खेतले,लक्ष्मण पाटोळे, आशिष राणे, सुनील घरत, विश्वनाथ कडू, मचिंद्र चव्हाण, बबलू गुप्ता, हरितोष गायकवाड आदी पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योतिष नांबियार, रितेश सत्यनाथ, विनोद कुमार, बाळा सावंत, अर्जुन इंगोले, नागेश शेट्टी, कांचन जहा, श्रीकुमारी मोहन, रमेश पांडे, सिद्धेश तावडे, रामानुजम आदी पदाधिकारी व भाजपाचे शेकडो कार्यकर्त्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी वसई रोडचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी केले होते.