
ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात प्राण पणाला लावून भारतीय स्वातंत्रवीर आणि भारतीय जनता लढली.अनेकांनी प्राणांची आहुती दिली.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.कारण काय होत?* ब्रिटिशांच्या दडपशाहीतून देश व देशबांधव मुक्त व्हावेत.देशाला स्वातंत्र्य मिळाव. देशात लोकशाहीची स्थापना व्हावी. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्यअसावे. मत देण्याचा आणि मत मांडण्याचा अधिकार प्रतेक नागरिकाला मिळाला पाहिजे.जनतेचे राज्य असले पाहिजे.
जनतेच्या *योग्य इच्छा आकांक्षा याला सर्वप्रथम स्थान देत देशाचा राज्य कारभार चालला पाहिजे आणि *देशाच्या विकासाबरोबर नागरिकांच्या सुसह्य व आनंददायी जगण्याला प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे.*
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली.कालच आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य याचे गोडवे गायले गेले.
वसई तालुक्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून डोंगराच्या कुशीत वसलेले काशीद कोपर नावाचे गाव आहे.सरकारला त्या डोंगरावर पाण्याच्या टाक्या बाधायच्या आहेत.सरकारने याबाबत निर्णय घेताना कोणताही संवाद ग्रामस्थांशी केला नसल्याचे समजते. त्या मुळे गावातील वस्तीला धोका निर्माण झालेला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या मुळे तेथे टाक्या न उभारता, अन्य उपलब्ध जागी बांधाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.त्या करिता गावातील नागरिक महिलांसह गेली अनेक दिवस लोकशाहीतील शांतता मार्गाने रोज धरणे/उपोषणास बसले होते. माझ्या सह अनेकांनी त्यांना भेट देऊन त्यांचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्या म्हणण्यात तथ्य हि दिसून येत होत.
त्यांचा हा विरोध मोडून काढायचा असा सरकरचा व प्रशासनाचा मनोदय सोशल मीडिया वरील फोटो वरून दिसून येतोय. त्यांना आज तेथून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून उठविण्यात आल्याचे आणि काहींना मांडवी पोलीस स्टेशन मध्ये आणल्याचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध झालेले आहेत.
हि घडत असलेली घटना आणि रोज समजमध्यामावर आपण जे पाहत आहोत त्या वरून असा प्रश्न मनात निर्माण होतोय की, भारतीय लोकशाही ही दडपशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे का?
काशीद कोपर गावकऱ्यांच्या जगण्यावर संभाव्य धोका निर्माण होऊन हा पाण्याच्या टाक्या बांधण्याचा प्रकल्प होत असेल तर तो होऊ नये, तो अन्य जागेवर व्हावा या त्यांच्या मागणीस, मी वसईकर अभियान व ग्राम स्वराज्य अभियान ,वसई या संघटनांचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि राहील.