
प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय अंतर्गत सागर शेत येथील भारत पेट्रोल सप्लाय कंपनीला कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटिस देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढे काय कारवाई होते पाहू.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग समिती आय हद्दीतील सागर शेत येथील भारत पेट्रोल सप्लाय कंपनीने केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भारतीय जनता पार्टी वसई शहर मंडळचे सरचिटणीसप अमित पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर कंपनीला प्रभाग समिती आय तर्फे जागेची व बांधकाम परवानगीची कागदपत्रे ७ दिवसात सादर करण्याबाबत दि. ५.४.२०२१ रोजी जावक क्र. वविशम /अति. /६/२०२१-२२ नुसार नोटिस देण्यात आली आहे. सदर प्रकरणी पुढे काय कारवाई होते ते पाहू. अशा हजारो नोटिसा महानगरपालिका प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत. मात्र पुढे कोणतीही कारवाई होत नाही.