


प्रतिनिधी : गुरुवार दिनांक ७ मे २०२० रोजी भीम प्रेरणा जागृती संस्था नऊ गाव वसई तालुका पश्चिम विभागातर्फे नऊ गावातील गरीब आणि गरजू जनतेस जीवनावश्यक वस्तू वाटप करून तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती साजरी केली. गेल्या तीन महिन्यांपासून सर्व ठिकाणी कोरोना विषाणूने थैमान माजवले असून लोकडाऊन असल्याने सर्व लोकांचे घरात बसून उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकाचे घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्या आहेत. अश्या परिस्थितीत संस्थेचे अध्यक्ष अॅड. चेतन भोईर यांनी नऊ गावातील दानशूर लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. सदर आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. काही लोकांनी आर्थिक मदत केली आहे आणि काही लोकांनी जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. या सर्व वस्तू आंबेडकर वाडी-नाळा येथे एकत्र करून गावातील तरुण कार्यकर्ते आणि महिला यांनी पॅकिंग केले. लोकडाऊन मुळे संस्थेचे ठराविक पदाधिकारी यांनी स्वतः जाऊन नऊ गावातील गरीब जनतेस जिवनाआवश्यक वस्तू वाटप केल्या. सदर उपक्रम राबवत असताना विशेष म्हणजे काही महिलांनी मदत केली आहे. बौधाचार्य:संतोष जाधव, डॉ. रनधिर ढाकरके यांनी फक्त व्हाट्सएप वर मेसेज बघुन मदत केली. विषेशतः दर्पण अनंत चव्हाण या मुलाने आपल्या वाढदिवसानिमित्त खाऊच्या पैशातून मदत केली आहे. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी भीम प्रेरणा जागृती संस्थेचे उपाध्यक्ष: भरत पाटील, सचिव : राजेश जाधव, प्रसिद्धी प्रमुख : हरेश मोहिते, उपाध्यक्ष : रत्नाकर वागळे, नितीन भोईर, यतीन जाधव, निलेश भोईर, सुनील मोहिते, भूपेंद्र भोईर या सर्व कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले. संस्थेचे अध्यक्ष अँड. चेतन भोईर यांनी दणगी दिलेल्या व नऊ गावातील लोकांचे आभार मानले.