
प्रतिनिधी :
वसई येथील भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा जास्तच सुळसुळाट झाला असून सर्वसामान्य जनतेची कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र नव निर्माण पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, वसई येथील भूमी अभिलेख कार्यालयात दलालांच्या माध्यमातून कामे होतात. सर्व सामान्य भूमिपुत्र काम करण्यासाठी, आपल्या जागेची मोजणी करण्यासाठी गेला तर त्याचे काम रखडवले जाते. मात्र तेच काम दलालाच्या माध्यमातून गेले तर तात्काळ होते, अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष (वसई ग्रामीण) प्रशांत आर. धोंडे यांच्याकडे गेल्यानंतर सदर बाबत त्यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना लिखित तक्रार दिली असून भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट बंद न झाल्यास व सर्वसामान्य जनतेची कामे न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.