
महसूल प्रशासन अधिकारी व तहसीलदार यांना भूषण वर्तक कडून आर्थिक फायदा?
प्रतिनिधी : गेल्या अंकात बातमी प्रसिद्ध केल्या मुळे भूषण वर्तक याची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही आहे भूषण वर्तक हा व्यक्ती बिनशेतीची कामे व तहसील च्या निगडित असलेले जमिनीची व दाखल्याची कामे हा सरासपणे करत आहे तसेच तहसील कार्यालयात त्याचे वावर एखादी अधिकारी प्रमाणे असते आणि प्रशासनातील अधिकारी व तहसील दार त्याचे कामे जलद गतीने करतात या वरून लक्षात येते कि ह्याचे आर्थिक संबंध असल्याने सर्व सुरळीत सुरु आहे. तसेच वसई तहसील आवारात 12 ते 15 दलाला पैकी भूषण वर्तक हा अव्वल आहे आणि वसई तहसीलदार त्याला अधिक महत्व देत आहे अशी चर्चा सुद्धा आहे तसेच या प्रकारणाची माहिती युवाशक्ती एक्स्प्रेच्या कार्यकारी संपादिका यांनी वरिष्ठच्या निदर्शनास आणू दिले आहे आणि मागणी केली आहे कि वसई तहसील मध्ये दलालाची बंदी असावी असे नाम फलक लावावे, सरकारी कार्यलयात दलालांचा सुळसुळाट ही अत्यंत गंभीर बाब असून पालघर जिल्हाधिकारी यानी याची गांभीर्याने दखल घेऊन दलालाना बंदी करावी तसेच संपूर्ण प्रकरण वरिष्ठच्या निदर्शनास आणू देणार आहे असे रुबीना मुल्ला यांनी लेखी पत्रात लिहिले आहे